मुंबई : मालाड पूर्व येथे दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी पोलिसांनी ३७ वर्षीय पित्याला अटक केली. आरोपीविरोधात बलात्कार, धमकावणे व बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण कायद्याअंतर्गत (पोक्सो) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्वयंसेवी संस्थेसाठी काम करणाऱ्या महिलेला हा प्रकार समजल्यानंतर तिने याप्रकरणी पोलिसांकडे तक्रार केली होती. पीडित मुली १३ व १४ वर्ष वयोगटातील आहेत. आरोपी पिता २०२१ पासून पीडित मुलींवर अत्याचार करीत होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा >>> एमएमआरडीएत पाच सेवानिवृत्त अधिकाऱ्यांची विशेष कार्य अधिकारीपदी वर्णी, महिन्याला वेतनापोटी १२ लाखांची उधळपट्टी

स्वयंसेवी संस्थेत काम करणाऱ्या महिलेने परिसरातील मुलींशी संपर्क साधून त्यांचे समुपदेशन केले असता पीडित मुलींनी त्यांच्यासोबत घडलेला प्रकार सांगितला. आरोपी पिता मुलींना धमकावत असल्यामुळे त्या याप्रकरणी तक्रार करण्यास घाबरत होत्या. अखेर स्वयंसेवी संस्थेसाठी काम करणाऱ्या महिलेने याप्रकरणी कुरार पोलिसांकडे तक्रार केली. त्यानुसार पोलिसांनी याप्रकरणी बलात्कार, धकावणे व पोक्सो कायद्याअंतर्गत आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला. त्यानंतर गुरूवारी आरोपीला अटक करण्यात आली. तक्रारदार महिला शोषणाविरोधात आवाज उठवणाऱ्या कार्यकर्त्या आहेत. त्यांच्या तक्रारीवरून आरोपीला अटक करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.