मुंबई : ‘ड्रीम ११’ कंपनीच्या पाच अधिकाऱ्यांना ई-मेल पाठवून गोपनीय डेटा ‘डार्कनेट’वर सार्वजनिक करण्याची धमकी देणाऱ्या अभिषेक प्रताप मुकेश कुमार सिंह याला कर्नाटकातून अटक करण्यात आली. आरोपीने कंपनीच्या गिटहब येथील १२०० महत्त्वाच्या फाईल मिळवल्या असून त्या ‘डार्कनेट’वर अपलोड करण्याची धमकी दिली होती. आरोपीने असे दोन ई-मेल कंपनीला पाठवले होते.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ११ ऑगस्ट रोजी सिंह यांनी ‘ड्रीम ११’ कंपनीच्या पाच वरिष्ठ अधिकाऱ्यांना ई-मेलद्वारे डेटा लिक करण्याची धमकी दिली. यापैकी कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी हर्ष जैन एक होते. या ई-मेलमध्ये लिहिले होते, ‘ड्रीम ११’च्या १२०० महत्त्वाच्या फाईल्सची माहिती आपल्याकडे आहे.

हेही वाचा…मुंबई : लिपिक पदाच्या भरती प्रक्रियेतील अटी वादात, जाचक अटी रद्द करण्याची मागणी

डार्क वेबवर या फाईल्स अपलोड करण्यापासून तुम्हाला रोखायचे असेल तर तुम्ही प्रयत्न करू शकता, त्याला कंपनीने प्रतिसाद दिल्यानंतर आरोपीने १२ ऑगस्टला पुन्हा ई-मेल पाठवून धमकी दिली होती. महाराष्ट्र सायबर विभागाने तंत्रज्ञानाच्या मदतीने तपास करून आरोपीला कर्नाटकातून अटक केली. आरोपीने ई-मेल पाठवलेला लॅपटॉप व मोबाइल पोलिसांनी जप्त केला आहे.