मुंबई: घराबाहेर खेळणाऱ्या एका पाच वर्षीय मुलीला निर्जन ठिकाणी नेऊन शेजाऱ्याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची घटना गुरुवारी घडली. याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने केलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी ५५ वर्षीय व्यक्तीला अटक केली.
हेही वाचा – झोपु प्राधिकरणाचे २०३० पर्यंत दहा लाख घरांचे लक्ष्य!
ही पीडित मुलगी आई-वडिलांसोबत राहते. गुरुवारी दुपारी ती घराबाहेर खेळत असताना शेजारी राहणाऱ्या व्यक्तीने पीडित मुलीला खाऊचे आमिष दाखवून एका निर्जन ठिकाणी नेले. तेथे त्याने पीडित मुलीवर लैंगिक अत्याचार केले. घरी परतल्यानंतर मुलीने घडलेला प्रकार आई-वडिलांना सांगितला. मुलीच्या आईने याप्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली.