गेट वे ऑफ इंडिया ते मांडवा जलमार्गावर एक प्रवासी चालत्या बोटीतून तोल जावून समुद्रात पडला. सुदैवाने त्याला पोहता येत असल्याने तो बचावला. हा प्रवासी समुद्रामध्ये पडल्याचं लक्षात येताच या बोटीवर एकच गोंधळ उडाला. मात्र बोटीवरील लोकांनी प्रसंगावधान दाखवत या तरुणाला तातडीने बोटीमध्ये परत ओढून घेतलं.

प्रशांत कांबळे असं या प्रवाशाचे नाव आहे. आज सकाळी मांडवा जेटीपासून काही अंतरावर ही घटना घडली. सकाळी सव्वानऊ वाजता गेट वे ऑफ इंडियावरून सुटलेली अजंठा कंपनीची अल नुर ही बोट मांडवा बंदराकडे निघाली. बोट मांडवा जेटीजवळ आली असता प्रशांत कांबळेचा तोल जाऊन तो समुद्रात पडला. यावेळी प्रशांतच्या पाठीवर बॅगही होती. प्रशांत समुद्रात पडल्यानंतर या बोटीवरील प्रवाशांनी एकच आरडाओरड सुरु केला. या गोंधळामुळे प्रशांत पडलेल्या ठिकाणापासून बोट फार दूर जाण्याआधीच थांबवण्यात आली.

gang created terror in Panmala area on Sinhagad Road
सिंहगड रस्त्यावरील पानमळा परिसरात वाहनांची तोडफोड, दहशत माजविणाऱ्या टोळक्याविरुद्ध गुन्हा
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
Police detained three Bangladeshis living illegally in Bhiwandi for 15 years
भिवंडीतून तीन बांगलादेशींना ताब्यात, बनावट आधारकार्डासह शिधापत्रिका, पॅनकार्ड जप्त
Chhota Rajan gang. session court. Pre-arrest bail ,
विकासकाकडून दहा कोटींची खंडणी मागण्याचे प्रकरण : छोटा राजन टोळीच्या दोघांना सत्र न्यायालयातून अटकपूर्व जामीन
Vasai Virar Municipal Solid Waste Management Project marathi news
‘पैसे नाहीत, असे कसे म्हणता?’, महाराष्ट्र सरकारला सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
Shantinagar motorcycle thief , Bhiwandi , Tadi ,
ठाणे : ताडी पिण्यासाठी आला अन् पोलिसांच्या तावडीत सापडला, मोक्का आणि जबरी चोरीच्या १८ गुन्ह्यात होता फरारी
police injured , mumbai , rickshaw ,
मुंबई : पोलिसाला रिक्षासोबत फरफटत नेले, रिक्षाचालकाविरोधात गुन्हा दाखल
accused akshay shinde encounter
अन्वयार्थ : हत्येचा गुन्हा दाखल कराच

बोटीवरील कर्मचाऱ्यांनी त्याला दोरीच्या सहायाने पुन्हा सुखरूप बोटीत घेतले. हे प्रकरण पोलिसात गेलं मात्र यात आपली चूक असल्याचं प्रशांतने मान्य केलं. या घटनेनंतर जलमार्गावरील प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण आहे.

Story img Loader