भाजपाचे महाराष्ट्र सोशल मीडिया प्रभारी जितेन गजारिया यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्याबाबत आक्षेपार्ह ट्वीट केल्याने मोठा वाद निर्माण झाला आहे. शिवेसना याविरोधात आक्रमक झाली असून सायबर सेलकडे तक्रार केली. यानंतर मुंबई पोलीस क्राइम ब्रांचच्या सायबर सेलने जितेन गजारिया यांना समन्स बजावलं होतं. जितेन गजारिया यांनी बीकेसमध्ये पोलीस ठाण्यात हजेरी लावत आपला जबाब नोंदवला आहे. मात्र त्यांच्या या ट्वीटवरुन शिवसेना नेते संताप व्यक्त करत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनीदेखील जितेन गजारिया यांच्या ट्वीटवर संताप व्यक्त केला असून राजकारणात मोठं नाव कमावण्यासाठी बाळासाहेब ठाकरेंच्या सुनेबद्दल असं वक्तव्य केलं जात असल्याचं म्हटलं आहे. एएनआयशी बोलताना त्यांनी स्वार्थासाठी पक्ष सोडणारे जितेन गजारिया आता राज्यातील महिलांवर आक्षेपार्ह भाष्य करत असल्याची टीका केली.

मुख्यमंत्र्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्याबद्दल भाजपा नेत्याचं आक्षेपार्ह ट्वीट; पोलिसांनी बजावली नोटीस

“जितेन गजारिया कोण आहेत? कांगारुप्रमाणे त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधून त्यांनी भाजपामध्ये उडी मारली आणि आता रश्मी वहिनी व राज्यातील महिलांबाबत आक्षेपार्ह विधान करत आहेत,” असं किशोरी पेडणेकरांनी म्हटलं आहे.

“स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंच्या सून, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या पत्नी आणि आदित्य ठाकरेंच्या आई असणाऱ्या रश्मी वहिनींना यामध्ये ओढण्याचं कारण काय?,” अशी विचारणा यावेळी त्यांनी केली.

“बाळासाहेबांनीच भाजपाचा हात धरत त्यांना राजकारणात मोठं केलं आहे. आता आणि ते त्यांच्या सुनेबद्दल अशी भाषा वापरत आहेत. त्यांना इतका अहंकार कुठून आलाय? आम्ही त्यांना आव्हान देतो जर हे गजारिया आमच्यासमोर आले तर शिवसेनेची महिला आघाडी त्यांना पाहून घेईल,” असा इशारा यावेळी त्यांनी दिला.

नेमकं काय झालं होतं ?

भाजपाचे महाराष्ट्र सोशल मीडिया प्रभारी जितेन गजारिया यांनी रश्मी ठाकरे यांच्या विरोधात ट्वीट करताना ‘महाराष्ट्राची राबडी देवी’ असे शब्द वापरले होते. जितेन गजारिया यांच्या या आक्षेपार्ह ट्वीटवर महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी आक्षेप नोंदवला होता. त्यानंतर सायबर पोलिसांत तक्रार दाखल केली होती. या ट्वीटवरुन सायबर पोलिसांनी जितेन गजारिया यांना नोटीस पाठवत जबाब नोंदवून घेतला. दरम्यान हे ट्वीट नंतर जितेन गजारिया यांनी डिलीट केलं.