मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांची प्रकृती बिघडल्याची माहिती समोर आली. महापौर कार्यालयाने याबाबतचं वृत्त दिलं आहे. काल रात्रीपासून (१७ जुलै) त्यांना छातीत त्रास होत होता. त्यानंतर सकाळी त्रास अधिक वाढल्यानं त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मुंबईतील ग्लोबल रुग्णालयात महापौरांना दाखल करण्यात आल्याची माहिती कार्यालयाच्या वतीने देण्यात आली आहे. त्यांच्या प्रकृतीबद्दल अद्याप माहिती देण्यात आलेली नाही. मुंबईत मुसळधार पावसामुळे चेंबूरमध्ये दुर्दैवी दुर्घटना घडली. रात्री आपल्याला घटनास्थळी जाता आलं नाही, असं सांगत त्यांनी मृतांबद्दल दुःख व्यक्त केलं होतं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दरम्यान, किशोरी पेडणेकर यांना रुग्णालयात दाखल करताच तातडीने विविध चाचण्या करण्यात आल्या. डॉक्टरांचं एक पथक त्यांच्यावर उपचार करत आहे. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं वैद्यकीय सूत्रांनी सांगितलं. मात्र,त्यांना कधीपर्यंत डिस्चार्ज मिळेल याबाबतची माहिती देण्यात आलेली नाही.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्विट करत, किशोरीताईंना लवकर बरे वाटावे, अशी सदिच्छा व्यक्त केली आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbai mayor kishori pednekar has been admitted due to chest pain msr