शिवसेनेच्या नेत्या आणि मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी महाराष्ट्र भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर कठोर शब्दांमध्ये टीका केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका करताना चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांची पत्नी रश्मी ठाकरेंचा उल्लेख केल्याच्या मुद्द्यावरुन पेडणेकर यांनी संताप व्यक्त केलाय. रश्मी ठाकरे कधी राजकारणात नसताना त्यांचं नाव चंद्रकांत पाटील टीका करताना का घेतात असा सवाल उपस्थित करत सतत प्रकाशझोतात असणाऱ्या अमृता फडणवीस यांना विरोधी पक्षनेता बनवा असा खोचक सल्लाही पेडणेकर यांनी दिलाय.

चंद्रकांत पाटील यांनी राज्यात आजपासून सुरु झालेल्या हिवाळी अधिवेशनाच्या आधीच मुख्यमंत्र्यांवर टीका केली. प्रकृतीच्या कारणास्तव गेल्या काही दिवसांपासून वर्क फ्रॉम होम करणारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अधिवेशनासाठी उपस्थित राहतील अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी दिली. मात्र चंद्रकांत पाटील यांनी पहिल्याच दिवशी मुख्यमंत्र्यांच्या अनुपस्थितीवरुन टोला लगावला. मंगळवारीही पाटील यांनी अशीच टीका केलीहोती. याच टीकेसंदर्भात पत्रकारांनी महापौर पेडणेकर यांना, रश्मी ठाकरेंकडे मुख्यमंत्री पद जाईल अशी शक्यता चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केलीय असा प्रश्न विचारला असता महापौरांनी त्यावर सविस्तर उत्तर दिलं.

Image Of Devendra Fadnavis.
Devendra Fadnavis : राज्य निवडणूक आयुक्तांच्या निवडीचे सर्वाधिकार देवेंद्र फडणवीस यांना; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी मंत्रिमंडळाचा निर्णय
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Devendra Fadnavis
Devendra Fadnavis : “इंदिरा गांधी मोठ्या नेत्या, पण तेव्हा आमच्यासाठी व्हिलन होत्या”, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं विधान
Sanjay Raut Devendra Fadnavis
Devendra Fadnavis : वाल्मिक कराड आणि फडणवीसांचं नेमकं नातं काय? संजय राऊतांचे मुख्यमंत्र्याना गंभीर सवाल
देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू ते भाजपाचे कार्यकारी अध्यक्ष; कोण आहेत रवींद्र चव्हाण? (फोटो सौजन्य @Dev_Fadnavis)
Maharashtra Politics : देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू ते भाजपाचे कार्यकारी अध्यक्ष; कोण आहेत रवींद्र चव्हाण?
Devendra Fadnavis On Local Body Election
Devendra Fadnavis : आगामी महापालिकेच्या निवडणुकीबाबत देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान; म्हणाले, “पुढील तीन-चार महिन्यांत…”
Devendra Fadnavis
Devendra Fadnavis : राष्ट्रीय अध्यक्ष व्हायला सांगितलं तर व्हाल का? मुख्यमंत्री फडणवीसांचं मोठं विधान; म्हणाले, “पक्ष जे सांगेल…”
CM Devendra Fadnavis Nagpur Interview
Devendra Fadnavis : कठोर राजकारणी कोण मोदी की अमित शाह? देवेंद्र फडणवीसांनी काय उत्तर दिलं?

नक्की वाचा >> उद्धव ठाकरे आदित्य ठाकरेंकडे पदभार का देत नाहीत?; चंद्रकांत पाटील म्हणाले “बहुतेक काँग्रेस, राष्ट्रवादीप्रमाणे मुलावरही…”

“चंद्रकांत पाटील मोठे नेते आहेत. पण कधी कधी मला त्यांची किव करावीशी वाटते. माझ्यासारख्यांनी त्यांच्याबद्दल असं बोलणं चुकीचं आहे असं माझे संस्कार सांगतात. इतक्या मोठ्या व्यक्तीबद्दल मी नाही बोललं पाहिजे असे माझ्या पालकांचे, गुरुंचे आणि बाळासाहेबांचे संस्कार आहेत. पण ते जर एक पत्नी म्हणून रश्मी उद्धव ठाकरेंबद्दल बोलत असतील तर अमृता फडणवीस यांना ते विरोधी पक्षनेता करणार आहेत का हे सांगावे. कारण अमृता फडणवीस या जास्त प्रकाशझोतात आहेत. रश्मी वहिनी कधीच प्रकाशझोतात नसतात तरी त्यांचं नाव घेतलं जातं,” असं म्हणत पेडणेकर यांनी संताप व्यक्त केला.

पुढे बोलताना पेडणेकर यांनी थेट पंतप्रधान मोदींची यासंदर्भात भेट घ्यावी लागेल असंही वक्तव्य केलं. “अरे तुम्हाला कळतंय का? एखाद्या स्त्रीचं तुम्ही किती हनन कराल? एक वेळेस आदित्य ठाकरेंचं नाव घेणं समजून शकते ते मंत्री आहेत. पण रश्मी वहिनींचं नाव का घेता? त्यात तर कधीच नसतात. तुमच्या फडणवीस बाई आहेत ना त्या प्रकाशझोतात आहेत. मग त्यांना बनवा ना विरोधी पक्षनेता. महिलांची नावं कशाला घेता. हे अजिबात चालू देणार नाही. हे काय चाललंय. तुम्ही महाराष्ट्राच्या राजकारणाची पातळी किती खाली आणणार आहात? आता याच कामासाठी आम्हाला पंतप्रधानांची भेट घ्यावी लागेल. तुमची भारतीय जनता पार्टी हिंदू म्हणून पुढे येते पण महिलांचं हनन करणं ही हिंदू संस्कृती नाही,” असं पेडणेकर म्हणाल्या.

Story img Loader