मुंबई : पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेंट्रल विभागाच्या वाणगाव – डहाणू रोड रेल्वे स्थानकांदरम्यान उड्डाणपुलाच्या पायाभूत कामानिमित्त शनिवारी सकाळी १०.३० ते ११.३० आणि रविवारी सकाळी ९.५० ते १०.५० या वेळेत ब्लाॅक घेण्यात येणार आहे. या ब्लाॅकमुळे पश्चिम रेल्वेवरील काही रेल्वेगाड्या रद्द करण्यात येणार आहेत. तर, इतर रेल्वेगाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम होईल.
शनिवारी वाणगाव – डहाणू रोड रेल्वे स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन मार्गावर ब्लाॅक असल्याने गाडी क्रमांक ९३०१३ विरार-डहाणू रोड पॅसेंजर वाणगावपर्यंत चालवण्यात येणार आहे. तर, वाणगाव – डहाणू रोड दरम्यानची रेल्वे सेवा बंद असेल. गाडी क्रमांक ९३०१५ चर्चगेट-डहाणू रोड पॅसेंजर वाणगावपर्यंत चालवण्यात येईल. तर, वाणगाव – डहाणू रोड दरम्यानची रेल्वे सेवा बंद असेल.
हेही वाचा…वैद्यकीय पदव्युत्तर प्रवेशाचे पुन्हा वेळापत्रक बदलले
रविवारी गाडी क्रमांक ९३०११ चर्चगेट – डहाण रोड पॅसेंजर वाणगावपर्यंत चालवण्यात येणार आहे. वाणगाव – डहाणू रोडदरम्यान रेल्वे सेवा बंद असेल. गाडी क्रमांक ९३०१३ विरार-डहाणू रोड पॅसेंजर बोईसरपर्यंत चालवण्यात येईल. बोईसर – डहाणू रोडदरम्यानची रेल्वे सेवा बंद असेल. तर, शनिवारी आणि रविवारी ब्लाॅक कालावधीत लांबपल्ल्याच्या काही रेल्वेगाड्या विलंबाने धावतील, अशी माहिती पश्चिम रेल्वे प्रशासनाने दिली.