पंतप्रधान मोदींच्या हस्ते आज मुंबईत विविध विकासकामांचं उद्घाटन करण्यात आलं. मुंबईच्या विकासाशी संबंधित ४० हजार कोटींच्या विकासकामांचं उद्घाटन आणि भूमिपूजन मोदींनी केलं. याशिवाय, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज मुंबईत मेट्रो २ अ (दहिसर ते अंधेरी पश्चिम, डीएन नगर) मार्गिकेतील वळनई ते अंधेरी पश्चिम आणि मेट्रो ७ (दहिसर पूर्व ते गुंदवली, अंधेरी पूर्व) मार्गिकेतील गोरेगाव पूर्व ते गुंदवली अशा दुसऱ्या टप्प्याचे लोकार्पण झाले.

यासाठी गुंदवली मेट्रो स्थानक येथे पंतप्रधान नरेंद्र मोदीं आले होते. यावेळी पंतप्रधान मोदींनी गुंदवली ते मोगरा मेट्रो स्थानक असा मेट्रो प्रवास केला. तर लोकार्पणानंतर शुक्रवारी दुपारी ४ वाजल्यापासून मेट्रो २ अ आणि ७ मेट्रो पूर्ण क्षमतेने धावणार आहे. मेट्रोने दहिसर ते अंधेरी प्रवास केवळ ३५ मिनिटात करण्याचे मुंबईकरांचे स्वप्न अखेर यामुळे पूर्ण होणार आहे.

Information that 183 buses are closed every day in the state of Maharashtra
एसटी बसमध्ये वारंवार बिघाड… रोज १८३ बसच्या प्रवाश्यांना अडचण…
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Special train from Konkan route , Konkan train ,
कोकण मार्गावरून विशेष रेल्वेगाडी
Pune Municipal Corporation construction department issued notices to 125 construction projects in the city and stopped work Pune print news
पुणे: बांधकाम बंद ठेवण्याच्या नोटिशींचा ‘फार्स’ ?
BMC chief inspects development works in Borivali
विकासकामांच्या गुणवत्तेवर अधिक भर द्यावा; पालिका आयुक्त भूषण गगराणी यांचे अधिकाऱ्यांना आदेश
Marijuana worth Rs 115 crore seized from Mumbai airport in three months
मुंबई विमानतळावरून तीन महिन्यात ११५ कोटींचा गांजा जप्त
inspection of TMT drivers List of instructions for drivers thane news
टीएमटी चालकांची सकाळ संध्याकाळ तपासणी;  चालकांसाठी सुचनांची यादी
thane police
कल्याणमध्ये तळीरामांची पोलीस उपायुक्तांकडून खरडपट्टी

नक्की पाहाPHOTOS : ‘मुंबईकरांच्या जीवनाचा नवीन साथीदार’ फडणवीसांनी शेअर केले ‘मेट्रो २ अ’ आणि ‘मेट्रो ७’चे खास फोटो

या मेट्रो मार्गिकेमुळे दहिसर ते अंधेरी प्रवास सुकर आणि अतिजलद होणार आहे. पण त्याहीपेक्षा म्हत्त्वाचे म्हणजे मेट्रो १ (घाटकोपर-वर्सोवा), मेट्रो २ अ आणि मेट्रो ७ अशा तीन मार्गिका एकमेकांशी जोडल्या जाणार असल्याने पूर्व आणि पश्चिम उपनगर प्रवास करणे शक्य होणार आहे.

तर आता रेल्वे, बेस्टनंतर मेट्रोचे ही जाळे तयार होणार असून सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा आणखी एक पर्याय उपलब्ध होणार आहे.मेट्रो २ अ मधील दहिसर ते डहाणूकरवाडी आणि मेट्रो ७ मधील दहिसर ते आरे असा पहिला टप्पा मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (एमएमआरडीए) एप्रिल २०२२ मध्ये वाहतूक सेवेत दाखल करण्यात झाला आहे.

Story img Loader