Mumbai Aarey Metro Car Shed : जवळपास अडीच वर्षांपूर्वी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी पर्यावरण ऱ्हासाच्या कारणामुळे आरेमधील प्रस्तावित कारशेडच्या कामाला स्थगिती दिली होती. तसेच, हे कारशेड कांजूरमार्गला हलवण्याची प्रक्रिया देखील सुरू करण्यात आली होती. मात्र, आता हा निर्णय विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फिरवला असून आरेमधील मेट्रो कारशेडच्या कामावरची स्थगिती त्यांनी उठवली आहे. त्यामुळे आता कारशेड आरेमध्येच होणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. तब्बल अडीच वर्ष स्थगित असलेल्या कारशेडचा मार्ग आता मोकळा झाला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राज्यात शिवसेना- भाजप युती सरकारच्या काळात मेट्रो-३चे कारशेड आरेमध्ये करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार कारशेडचे २५ टक्के कामही पूर्ण झाले होते. मात्र, नोव्हेंबर २०१९मध्ये महाविकास आघाडी सरकार सत्तेवर येताच तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पहिल्याच दिवशी आरे कारशेडच्या कामाला स्थगिती दिली. या कारशेडमुळे पर्यावरणाचे नुकसान होणार असल्याचे सांगत कारशेड आरेऐवजी कांजूरमार्ग येथे करण्याचा निर्णय ठाकरे यांनी घेतला होता. मात्र, या जागेच्या मालकीवरून केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्यातील वाद उच्च न्यायालयात गेला आहे.

“कोणत्याही परिस्थितीत ‘आरे’मध्ये कारशेड होऊ देणार नाही”

ठाकरे यांनी आरेमधील तर उच्च न्यायालयाने कांजूरमार्ग येथील कारशेडच्या कामाला स्थगिती दिल्याने गेल्या अडीच वर्षांपासून हा प्रकल्प रखडला आहे. मात्र, राज्यात सत्तांतर होताच शिंदे आणि फडणवीस यांनी मंत्रिमंडळाच्या पहिल्याच बैठकीत मेट्रो-३ चे कारशेड आरेमध्येच करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार पुढील सुनावणीच्या वेळी न्यायालयात भूमिका मांडण्याची सूचना फडणवीस यांनी महाधिवक्त्यांना दिली. त्यामुळे मेट्रो कारशेडचा गुंता सुटण्याचा मार्ग मोकळा झाला आहे

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbai metro aarey carshed cm eknath shinde lift stay uddhav thackeray shivsena pmw
Show comments