मुंबई : ‘कुलाबा – वांद्रे – सीप्झ भुयारी मेट्रो ३’ मार्गिकेतील वाहतूक सेवेत दाखल झालेल्या आरे – बीकेसी टप्प्यादरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी मुंबई मेट्रो रेल काॅर्पोरेशनने (एमएमआरसी) ‘मेट्रो कनेक्ट ३’ ॲप कार्यान्वित केले आहे. मात्र मंगळवारपासून या ॲपमध्ये तांत्रिक अडचणी येत आहेत. ॲन्ड्राॅईड मोबाइलवरून ॲप अपडेट केल्यानंतर तात्काळ ते बंद (क्रॅश) होत आहे. मंगळवारी रात्रीपासून असे प्रकार समोर येत आहेत. ॲप बंद झाल्याने प्रवाशांची गैरसोय होत असून त्यांना तिकिट रांगेत उभे राहून तिकीट काढावे लागत आहे. त्यामुळे प्रवाशांनी एमएमआरसीकडून पुढील सूचना येईपर्यंत ॲन्ड्राॅईड मोबाइलवरून ॲप अपडेट करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.

हेही वाचा : मुंबईचे तापमान वाढण्याची शक्यता

Abu Azmi visits Shivsena Shakha
Abu Azmi : अबू आझमींचं ठाकरेंच्या शिवसेनेकडून जंगी स्वागत, शाखेत बसून नागरिकांशी संवाद; शिवसैनिक प्रचार करणार
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Worli constituency tricolor fight between Shiv Sena MNS and Shinde groups
कोणाला ‘रिक्षा’ तर कोणाला ‘बॅट’, ‘गॅस सिलिंडर’…! अपक्ष उमेदवारांना निवडणूक चिन्हांचे वाटप
nana suryavanshi bjp
“त्यांना सांगा, आपली मैत्री आता २० तारखेनंतरच”, भाजपच्या जिल्हाध्यक्षांनी भर सभेत केली शिवसैनिकांची कानउघाडणी
five year old boy dies after suffocating in car park in garage
गॅरेजमधील मोटारगाडीत श्वास कोंडल्याने पाच वर्षांच्या मुलाचा मृत्यू
Balasaheb Thorat
Balasaheb Thorat : महाविकास आघाडी किती जागा जिंकणार? बाळासाहेब थोरातांचं उत्तर, “आम्ही…”
thane district senior citizen home voting
ठाणे जिल्ह्यात गृहमतदानाला सुरुवात
Ashok Pawar and Rushiraj Pawar
Ashok Pawar : आमदार अशोक पवार यांच्या मुलाचं अपहरण करून मारहाण केल्याचा गंभीर आरोप; राजकारणात खळबळ

आरे – बीकेसीदरम्यान प्रवास करताना प्रवाशांना मार्गिकेची सर्व माहिती उपलब्ध व्हावी, तिकिटासाठी रांगेत उभे रहावे लागू नये यासाठी एमएमआरसीने ‘मेट्रो कनेक्ट ३’ ॲप कार्यान्वित केले आहे. इंग्रजी, मराठी आणि हिंदी अशा तीन भाषांमध्ये हे ॲप उपलब्ध आहे. या ॲपचा वापर मोठ्या संख्येने प्रवासी करीत आहेत. हे ॲप मंगळवारी रात्रीपासून बंद पडण्याचे प्रकार घडत आहेत. ॲन्ड्राॅईड मोबाइलवर ॲप अपडेट करण्यासंबंधीचे नोटीफिकेशन येत आहे. ॲप अपडेट होत असतानाच अचानकते बंद होत असल्याचे निदर्शनास आले आहे. ‘आयफोन’धारक प्रवाशांना मात्रही ही अडचण येत नसल्याचे समजते. ॲप बंद झाल्याने प्रवाशांना रांगेत उभे राहून तिकिट काढावे लागत आहे. एकूणच या तांत्रिक अडचणीची एमएमआरसीने दखल घेतली आहे. ही तांत्रिक अडचण गुगलशी संबंधित आहे. त्यामुळे गुगलशी संपर्क साधून तांत्रिक अडचण दूर करण्याचा प्रयत्न सुरू असल्याची माहिती एमएमआरसीकडून देण्यात आली. ही अडचण दूर होऊपर्यंत प्रवाशांनी ॲप अपडेट करू नये, असे आवाहनही एमएमआरसीने केले आहे.