छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनल २ येथील मुंबई मेट्रो ३ च्या कामाने वेग घेतला आहे. या प्रकल्पातील पाचव्या बोगद्याचे काम नुकतेच पूर्ण झाले असून आता मेट्रोच्या कामास वेग येण्याची शक्यता आहे. मुंबईमध्ये मागील एक ते दिड वर्षापासून मेट्रोच्या ३ मार्गांचे काम सुरु आहे. याआधी माहिम येथील बोगद्याचे काम नुकतेच पूर्ण झाले होते. येत्या काळात मेट्रोचे काम आणखी वेग घेईल असा विश्वास मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने व्यक्त केला आहे.

मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनद्वारे कुलाबा – वांद्रे – सीप्झ मेट्रो-३ मार्गिकेचे काम जलदगतीने करण्यात येत आहे. यामध्ये सीप्झ व आंतरराष्ट्रीय विमानतळ या दोन ठिकाणी भुयारीकरणाचे (ब्रेक थ्रु) काम सुरु आहे. तर आता यातील पाचवा बोगदा पूर्ण झाल्याने या कामास वेग येणार आहे. माहीम येथील नया नगर येथील विवरात सप्टेंबर २०१७ मध्ये कृष्णा १ आणि कृष्णा २ ही टीबीएम यंत्रे उतरविण्यात आली होती. या यंत्रांना दादर शिवसेना भवन मेट्रो स्थानकापर्यंतची २.५ किमी लांबीची दोन भुयारे खोदण्याचे काम पूर्ण करायचे होते. यातील कृष्णा १ या यंत्राने नोव्हेंबर २०१७ मध्ये भुयारीकरणाचे काम सुरू केले. त्यानंतर कृष्णा २ यंत्र कार्यान्वित झाले.

Story img Loader