मुंबई मेट्रो ३ चा सुमारे तीन किलोमीटर्सचा बीकेसी ते धारावी स्थानकापर्यंतचा मार्ग हा मिठी नदीच्या खालून जातो. दुतर्फा जाणारा १.५ किलोमीटरचा हा मार्ग भूगर्भात तयार करताना विशेष तंत्रज्ञान वापरण्यात आले. या प्रकल्पामध्ये अनेक महत्त्वाची आव्हाने होती. खाणकाम सुरू असताना नदीचे पाणी खालच्या बाजू येण्यापासून रोखणे तसेच भविष्यातही हे पाणी खाली येणार नाही, याची तरतूद करणे, हा मार्ग संपूर्ण सुरक्षित राहील हे पाहणे हेही तेवढेच महत्त्वाचे होते. हे आव्हान मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने (एमएमआरसीएल) यशस्वीरित्या पार पाडले आहे.
येत्या जानेवारी महिन्यात सिप्झ ते बीकेसी या मेट्रो ३च्या पहिल्या टप्प्यास सुरुवात होणे अपेक्षित आहे.