मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचा (एमएमआरडीए) २०२३-२४ वर्षांचा २८,१०४.९८ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प शुक्रवारी सादर करण्यात आला. ५०१४.४१ कोटी रुपये तुटीच्या या अर्थसंकल्पास मंजुरी देण्यात आली. या अर्थसंकल्पात मुंबई आणि मुंबई महानगर प्रदेशातील वाहतूक व्यवस्थेच्या बळकटीकरणावर भर आहे.

  नव्या प्रकल्पांच्या कामाना प्रारंभ आणि अंतिम टप्प्यातील प्रकल्प पूर्ण करून ते सेवेत दाखल करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.  एमएमआरडीएच्या वतीने सध्या मेट्रो, सागरी सेतू, उन्नत मार्ग, रस्ते सुधार असे प्रकल्प सुरू आहेत. आता सागरी मार्ग, भूमिगत मार्ग, सागरी सेतू, पूर्वमुक्त मार्ग विस्तारीकरण असे नवे प्रकल्प हाती घेण्यात येणार आहेत. या पाश्र्वभूमीवर अर्थसंकल्पात २०२३मध्ये पूर्ण होणार असलेल्या आणि कामास सुरुवात होणार असलेल्या प्रकल्पांसाठी भरीव तरतूद करण्यात आली आहे. महत्त्वाचे म्हणजे या वर्षांत मुंबई पारबंदर प्रकल्प (शिवडी-न्हावाशेवा सागरी सेतू) आणि सूर्या प्रादेशिक पाणी पुरवठा प्रकल्पातील पहिला टप्पा पूर्ण होणार आहे. त्यामुळे या प्रकल्पांसाठीही भरीव तरतूद करण्यात आली आहे.

During the blockade gold and silver worth six crores were seized Pune news
नाकाबंदीत पावणेसहा कोटींचे सोने, चांदी जप्त; ओैंध परिसरात कारवाई
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
Mumbaikars contribution in mutual funds
म्युच्युअल फंडात मुंबईचाच सिंहाचा वाटा; १७.८३ लाख कोटींचे योगदान; मुंबईसह महाराष्ट्राच्या तुलनेत अन्य राज्यांत वाढती दरी
Preventive action, maharashtra vidhan sabha elections 2024, Preventive action five districts maharashtra,
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पाच जिल्ह्यांतील ३४ हजार सराइतांविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई
Reliance-Disney merger completed, Reliance-Disney,
रिलायन्स-डिस्ने यांचे ७०,३५२ कोटींचे महाविलीनीकरण पूर्ण
flying squads, Thane district code of conduct , assembly election
ठाणे : आचार संहितेच्या काळात २३ कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त; लाखो लिटर दारू; ६ कोटींचे मोफत वाटप साहित्य; १ कोटींचे अंमली पदार्थ
E-waste transportation, Navi Mumbai,
नव्या वर्षापासून ई-कचरा वाहतूक, ९०८ कोटींच्या कचरा संकलन कामाचाही प्रारंभ
Estimated tax evasion of 25 thousand crores 18 thousand fake companies busted by GST authorities print eco news
तब्बल २५ हजार कोटींच्या कर-चोरीचा अंदाज; जीएसटी अधिकाऱ्यांकडून १८ हजार बनावट कंपन्यांचा छडा

तरतूद अशी..(कोटी रुपयांत)

वर्सोवा-विरार सागरी सेतू : २०

ऑरेंज गेट ते नरिमन पॉईंट भुयारी मार्ग: १५०

ठाणे-बोरिवली भूमिगत मार्ग: ३०००

ठाणे तीन हात नाका वाहतूक सुधारणा: १००

चिरले ते खालापूर जोडरस्ता: २००

बाळकूम ते गायमुख सागरी किनारा मार्ग:  ५००

पालघर विकास कामे: १०००

देहरजी मध्यम प्रकल्प: ४४८

भिवंडी रस्ते विकास: २५

पूर्वमुक्त मार्ग विस्तार (छेडानगर ते ठाणे) : ५००

आंनदनगर ते साकेत रस्ता : ५००

कल्याण बाह्यवळण रस्ता टप्पा १ आणि ३ : १५०

२०२३ मध्ये पूर्ण झालेले प्रकल्प(खर्च कोटी रुपयांत)

मेट्रो २ अ : ६४१०

मेट्रो ७ : ६०२८ 

एससीएलआर वाकोला-कुर्ला उन्नत मार्ग : ३००

कुरारगाव भुयारी मार्ग : २६

कोपरी आरओबी : २५८

दुर्गाडी पूल : १०२

नावडेफाटा उड्डाणपूल: ७५

बोपाणे पूल : ११५

मुंब्रा वाय जंक्शन पूल : १०७

यंदा पूर्ण होणारे प्रकल्प(खर्च कोटी रुपयांत)

मुंबई पारबंदर प्रकल्प : १४३३६

सूर्या प्रादेशिक पाणी पुरवठा प्रकल्प, टप्पा १ : १९७७.२९

विमानतळ पूल : ४८

छेडा नगर उड्डाणपूल : २४९

कलिना उन्नत मार्ग : १४८

ऐरोली ते कटाई रस्ता : १४४१

मोटागाव ते माणकोली पूल : २२३.२५

बाळासाहेब ठाकरे स्मारक : ४००

अकुर्ली भुयारी मार्ग : ६०