मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) ‘वडाळा – कासारवडवली मेट्रो ४’, ‘कासारवडवली – शिवाजी चौक मेट्रो ४ अ’ आणि ‘वडाळा – सीएसएमटी मेट्रो ११’ या तीन मार्गिकांसाठी ठाण्यातील मोघरपाडा येथील १७४.०१ हेक्टर जागेवर कारशेड बांधण्यात येणार आहे. मात्र १७४.०१ हेक्टर जागेचा ताबा मिळत नसल्याने कारशेडचे काम सुरू होण्यास विलंब होत आहे. ही जागा एमएमआरडीएला हस्तांतरित करण्यासंबंधीचा शासन निर्णय प्रसिद्ध होऊन एक वर्ष उलटले तरी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून अद्यापही जागेचा प्रत्यक्ष ताबा मिळत नसल्याने एमएमआरडीएच्या अडचणी वाढल्या आहेत.

‘मेट्रो ४’ची कारशेड मोघरपाडा येथे प्रस्तावित आहे. मात्र मोघरपाडा येथील प्रस्तावित जागा देण्यास शेतकरी, स्थानिक रहिवाशांनी विरोध केल्याने कारशेड रखडली होती. शेवटी एमएमआरडीएने शेतकऱ्यांबरोबर चर्चा करून कारशेडचा वाद मिटवला. हा वाद मिटल्यानंतर ऑक्टोबर २०२३ मध्ये राज्य सरकारने मोघरपाड्यातील १७४.०१ हेक्टर जागा एमएमआरडीएला हस्तांतरित करण्यासंबंधीचा शासन निर्णय प्रसिद्ध केला. हा शासन निर्णय प्रसिद्ध झाल्याने कारशेडचा मार्ग मोकळा झाला असे वाटत होते. मात्र आजही कारशेडच्या कामाला सुरुवात होऊ शकलेली नाही. ही जागा ठाणे जिल्हाधिकाऱ्यांकडून हस्तांतरित करण्यास विलंब होत आहे. मात्र यामागील नेमके कारण जिल्हाधिकारी कार्यालयाकडून स्पष्ट करण्यात आलेले नाही. एमएमआरडीएकडून सध्या ‘मेट्रो ४’ आणि ‘मेट्रो ४ अ’चे काम वेगात सुरू आहे. असे असताना कारशेड मात्र मार्गी लागलेली नाही. त्यामुळे ‘मेट्रो ४’ आणि ‘मेट्रो ४ अ’ची कामे पूर्ण झाली आणि कारशेड नसेल तर मार्गिका वाहतूक सेवेत कशा दाखल होतील, असा प्रश्न आहे. यामुळे एमएमआरडीएची चिंता वाढली आहे. दरम्यान, जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

pune metropolis have lack of basic facilities and infrastructure
बकालीकरणाकडे…
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
Patra Chawl Redevelopment Project
विश्लेषण: पत्राचाळ पुनर्विकास प्रकल्प अखेर मार्गी लागणार… विलंब का? लाभ कुणाला मिळणार?
slum MIDC
एमआयडीसीलाही झोपड्यांच्या जागा, ‘क्लस्टर’साठी साडेबारा टक्के योजनेचा प्रस्ताव
Passenger service from Dadar to Ratnagiri stopped Mumbai news
दादरवरून थेट रत्नागिरी जाणारी पॅसेंजर सेवा बंद; प्रवाशांचे हाल
dream of five and half thousand policemens house in Lohgaon will come true soon
लोहगावात साडेपाच हजार पोलिसांच्या घराचे स्वप्न लवकरच साकार
Dnyanradha Multi State Co Operative Credit Society, fraud case, ED
ईडीकडून ३३३ कोटींच्या मालमत्तेवर टाच
maharashtra vidhan sabha election 2024 ,
बेलापूरच्या प्रचारात राम, कृष्ण, गजाननाचा गजर !