मुंबई : म्हाडामधील एका दालनात गुरुवारी झालेल्या धक्काबुक्की प्रकरणी प्रशासनाने एका रहिवाशाविरोधात गुन्हा दाखल केला. तसेच संबंधित रहिवाशाने म्हाडामधील अधिकारी, कर्मचारी, सुरक्षा रक्षक अशा १२ जणांविरोधात खेरवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. आपल्याला डांबून मारहाण केल्याचा आरोप या रहिवाशाने केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अंधेरी, डी. एन. नगर येथील मंगलमूर्ती सहकारी गृहनिर्माण सोसायटीच्या पुनर्विकासाअंतर्गत मूळ रहिवाशांना डिसेंबर २०२३ मध्ये ताबा देण्यात आला. यापैकी आठ रहिवाशांचा सोसायटी, विकासक यांच्याशी काही वाद होता. रहिवाशांनी याप्रकरणी न्यायालयासह म्हाडाकडे दाद मागितली होती. त्यानुसार म्हाडाच्या मुंबई मंडळाने याप्रकरणी सुनावणी घेत निर्णय दिला होता. मात्र हा निर्णय मान्य नसल्याने संबंधित रहिवासी गुरुवारी म्हाडामध्ये आला होता. यावेळी अधिकारी आणि रहिवासी विजय चाळके (निवृत्त पोलीस उपनिरीक्षक) यांच्यात वाद झाला. यातून धक्काबुक्की झाली, तर विजय चाळके यांनी महिला कर्मचाऱ्यासह उच्चपदस्थ अधिकाऱ्यांना शिवीगाळ केल्याचा आरोप करीत म्हाडाने चाळके यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार गुरुवारी संबंधित महिला कर्मचाऱ्यांनी खेरवाडी पोलीस ठाण्यात चाळके यांच्याविरोधात सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला, अशी माहिती उप मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल वानखेडे यांनी दिली.

हेही वाचा – मुंबई : रे रोडमध्ये जलवाहिनी फुटली, शिवडी परिसरातील पाणीपुरवठ्यावर परिणाम

हेही वाचा – राज्यातील १३ रेल्वे स्थानकांत फलाट तिकीट विक्रीवर निर्बंध, गर्दीचा भार कमी करण्यासाठी मध्य रेल्वेचा मोठा निर्णय

म्हाडाने गुन्हा दाखल केल्यानंतर विजय चाळके यांनी म्हाडातील १२ जणांविरोधात गुन्हा दाखल केला असून याप्रकरणी तपास सुरू आहे, अशी माहिती खेरवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक कविदास जांभळे यांनी दिली.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbai mhada vice president sanjeev jaiswal and 12 people have been charged with assault mumbai print news ssb