मुंबई : मागील काही दिवस मुंबईत असह्य उकाडा सहन करावा लागत होता. मात्र मंगळवारी पहाटे गारव्यामुळे मुंबईकरांना काहीसा दिलासा मिळाला. दरम्यान, पुढील दोन – तीन दिवस तापमानातील घट कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

हवामान विभागाच्या सांताक्रूझ केंद्रात मंगळवारी १५.२ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. सोमवारच्या तुलनेत तापमानात १.६ अंशानी कमी नोंदले गेले. तर कुलाबा केंद्रात १८.६ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. सोमवारच्या तुलनेत तापमान एक अंशाने कमी नोंदले गेले. पुढील दोन – तीन दिवस मुंबईतील किमान तापमानातील ही घट कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. अनेक भागात सोमवारपासून किमान तापमान २० अंशाखाली नोंदले जात आहे. काही भागात किमान तापमान ११ अंशाखाली नोंद झाली.

RBI Governor statement on exchange rate policy
रुपयाला सावरण्यासाठी थेट हस्तक्षेप नाही – मल्होत्रा
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
Pune Municipal Corporation is losing revenue due to income tax defaulters worth crores of rupees Pune print news
बड्यांची थकबाकी, सामान्यांना भुर्दंड, नक्की काय आहे प्रकार! कोट्यवधींचा कर थकल्याचा मूलभूत सुविधानिर्मितीला फटका
592 crores assistance to those affected by natural disasters
नैसर्गिक आपत्ती बाधितांना ५९२ कोटींची मदत, राज्यातील ५.४० लाख शेतकऱ्यांना दिलासा
article on cheaper electricity in loksatta pahili baaju
विजेचे अनाकलनीय गणित
Will Meghe Medical Group be taken over by Adani
मेघे वैद्यकीय समूह अदानी टेक ओव्हर करणार? नेमके काय घडले…
Budget is satisfactory but is the curse of self-reliance to producers
अर्थसंकल्प ‘समाधानकारक’ पण आत्मनिर्भरतेचा उत्पादकांना शाप?
Budget 2025 Provisions for the Defence Sector GDP Modernisation of the Defence Sector
संरक्षण क्षेत्रात ‘हवेत गोळीबार’

मुंबईत सोमवारी कमाल तापमानाच्या पाऱ्यात घसरण झाली होती. मात्र, मंगळवारी पुन्हा कमाल तापमानाचा पारा चढा होता. हवामान विभागाच्या कुलाबा केंद्रात ३०.२ अंश सेल्सिअस, तर सांताक्रूझ केंद्रात ३३.३ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. सोमवारच्या तुलनेत कुलाबा येथे २.२ अंशानी अधिक कमाल तापमान नोंदले गेले. मात्र, मुंबईच्या किमान तापमानात घट झाल्यामुळे दिवसभर दिलासादायक वातावरण होते.

हेही वाचा – मुंबईत पीएम २.५ च्या पातळीत वाढ

हेही वाचा – प्रधानमंत्री मातृवंदना योजनेत ३५ लाख लाभार्थी!

उत्तरेकडील थंड वाऱ्यांच्या प्रवाहामुळे राज्यात थंडी जोर धरण्याची शक्यता आहे. राज्यातील किमान तापमानात पुढील दोन दिवसांत आणखी घट होण्याची शक्यता आहे. राज्यातील तापमानातही मागील दोन दिवसांपासून चढ -उतार सुरू आहेत. जळगाव येथे मंगळावारी सर्वात कमी ८.८ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली.

Story img Loader