मुंबई : काही दिवसांपूर्वी मुंबई तसेच उपनगरांत थंडीने जोर धरला होता. त्यानंतर मात्र किमान तसेच कमाल तापमानात चढ – उतार सुरू आहे. परिणामी, मुंबईकरांना उकाडा सहन करावा लागत आहे. दरम्यान, मुंबईमध्ये शनिवार अधिक उकाडा जाणवत होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा >>> दुरावलेली बिबट्याची तीन पिल्ले संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या ताब्यात

किमान तापमानात वाढ झाल्याने मुंबईत काहीसा गारठा कमी झाला आहे. हवामान विभागाच्या कुलाबा केंद्रात शनिवारी ३४.९ अंश सेल्सिअस, तर सांताक्रूझ केंद्रात ३६.२ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. दोन्ही केंद्रावरील तापमान सरासरीपेक्षा अधिक नोंदले गेले होते. यामुळे शनिवारी दुपारी मुंबईकरांना असह्य उकाडा सहन करावा लागला. पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रवाह अधिक असल्याने पुढील एक ते दोन दिवस तापमानाचा पारा चढाच राहणार आहे. त्यानंतर तापमान ३१ ते ३४ अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. उत्तरेकडील थंड वाऱ्यांच्या अभावामुळे राज्यात थंडी कमी झाली आहे. तसेच किमान तापमानात वाढ होऊन थंडी कमी होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.