मुंबई : गर्दीच्या वेळी रेल्वेवर पडणारा ताण कमी करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने कामाच्या वेळेत बदल करण्यासाठी केलेल्या आवाहनाला सरकारी व खासगी कंपन्यांनी प्रतिसाद दिला आहे. मुंबई महानगरपालिकेनेही मुंबईतील केईएम, नायर, शीव व कुपर या महाविद्यालयांतील रुग्णालयांतील बाह्यरुग्ण विभागाच्या वेळांमध्ये २० डिसेंबरपासून बदल करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार बाह्यरुग्ण विभाग सकाळी ९ ऐवजी ८ वाजता सुरू होणार आहे. तर नोंदणी करण्याची वेळ ७ वाजता सुरू होणार आहे. या निर्णयाचे रुग्णांकडून स्वागत करण्यात येत आहे. मात्र डॉक्टरांनी वेळेवर यायला हवे, तसेच नोंदणी खिडकीच्या वेळही अनुकूल असावी, असे मुद्दे रुग्णांनी उपस्थित केले आहेत.

बाह्यरुग्ण विभाग सकाळी ९ ऐवजी ८ वाजता सुरू करण्याचा निर्णय फारच चांगला आहे. रुग्णालयात तपासणीसाठी येणाऱ्या रुग्णांना सकाळी ७ वाजताच रांग लावावी लागते. केसपेपर नोंदणी प्रक्रिया ८ वाजता सुरू होते. त्यामुळे सुरुवातीला नोंदणी करण्यासाठी, त्यानंतर बाह्यरुग्ण विभागाच्या बाहेर रांग लावावी लागते. त्यातच डॉक्टर कधीच वेळेवर येत नाहीत. त्यामुळे आम्हाला रुग्णालयात येण्यासाठी कार्यालयातून सुट्टी घ्यावी लागते. या निर्णयामुळे आम्हाला लवकर रुग्णालयात जाता येईल. तसेच कार्यालयातून सुट्टीही घ्यावी लागणार नाही. मात्र डॉक्टरही वेळेवर बाह्यरुग्ण विभागात हजर राहणे गरजेचे आहे. डॉक्टर वेळेवर उपस्थित राहिले तरच याचा फायदा होईल, असे अंबरनाथ येथून नायर रुग्णालयामध्ये उपचारासाठी आलेल्या अनिल दिवेकर यांनी सांगितले.

Delay in recommendation from Group of Ministers in GST Council meeting regarding insurance premiums
विमा हप्त्यांवर दिलासा नाही, जीएसटी परिषदेच्या बैठकीत मंत्रिगटाकडून शिफारशीत दिरंगाई; अन्य मुद्द्यांवर विचारविनिम
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
CAG report reveals errors in Maharashtras health services from 2016 to 2022
राज्यातील आराेग्य व्यवस्थेवर कॅगचे ताशेरे
Start your day with theory of shake it off
Stress Reliever : तणाव दूर करण्यासाठी ही थिअरी करेल तुम्हाला मदत; दिवसातून दोन ते तीन मिनिटे करा ‘ही ‘गोष्ट, वाचा, डॉक्टरांचे मत
Hospital Thane, Thane Arogya Vardhini Center,
ठाण्यात आरोग्य वर्धिनी केंद्र सुरू करण्यासाठी जागा मिळेना
Pankaj Bhoyar Minister , Wardha District Co-operative Sector , Wardha, Co-operative Sector Pankaj Bhoyar,
वर्धा जिल्ह्यातील सहकार क्षेत्रावर ताबा मिळविण्याचे मंत्री डॉ. पंकज भोयर यांचे लक्ष्य
bombay high court asks maharashtra government about money spent on medical infrastructure
आरोग्य क्षेत्रातील पायाभूत सुविधांसाठी किती निधी खर्च केला ? उच्च न्यायालयाची राज्य सरकारला विचारणा
health insurance situation in india, Indian insurance companies delay
अन्यथा : दवा, दुआ, दावा!

हेही वाचा – मुंबई : दादरमधील सराफ कंपनीच्या व्यवस्थापकाला मारहाण करून लुटले, दरोड्याचा गुन्हा दाखल

रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभाग ९ वाजता सुरू होत होता, तर डॉक्टर ९.३० वाजता येत होते. त्यामुळे डॉक्टरांनी वैद्यकीय तपासणी केल्यानंतर औषधे घेऊन किंवा काही तपासण्या करून कार्यालयात जाण्यासाठी उशीर होत होता. परिणामी, डॉक्टरांकडे तपासणीसाठी जाण्यासाठी एक तर कार्यलयातून सुट्टी घ्यावी लागत होती किंवा कार्यालयात उशिराने जावे लागत होते. मात्र मुंबई महानगरपालिकेने रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभागाच्या वेळेत केलेल्या बदलामुळे रुग्णांना दिलासा मिळू शकेल. सकाळी ८ वाजता डॉक्टर आल्यास त्यांच्याकडून तपासणी करून ९ वाजेपर्यंत कामावर जाता येईल. यामुळे सुट्टी घ्यावी लागणार नाही किंवा उशीरही होणार नाही, अशी प्रतिक्रिया विक्रोळीतील क्रांतीज्योती महात्मा ज्योतिबा फुले रुग्णालयात उपचारासाठी आलेल्या अशोक सणस यांनी दिली.

बाह्यरुग्ण विभागाची वेळ एक तास अगोदर करण्याचा निर्णय योग्य आहे. रेल्वे, बस, टॅक्सीतून येणाऱ्या रुग्णांना गर्दी होण्यापूर्वी रुग्णालयात पाेहोचता येईल. पण आमच्यासारख्या बदलापूरहून येणाऱ्या रुग्णांना रुग्णालयात येण्यासाठी लवकर घर सोडावे लागते. बाह्यरुग्ण विभाग ९ वाजता सुरू होत असल्याने आम्ही ७.३० वाजताच पोहोचतो. आता आम्हाला ६.३० वाजता पोहोचावे लागेल. पण त्यासाठी पहाटे ५ पूर्वी घर सोडावे लागेल. याचा आम्हाला त्रास होणारच. रेल्वेतील गर्दीच्या नियोजनासाठी वेळ बदलण्यात आली, पण केईएम रुग्णालयातील गर्दीच्या नियोजनासाठीही प्रशासनाने उपाययोजना कराव्यात, अशी प्रतिक्रिया बदलापूरहून केईएम रुग्णालयात उपचारासाठी आलेल्या प्रितम शिगवण यांनी व्यक्त केली.

रेल्वेतील गर्दी टाळण्यासाठी प्रशासनाने बाह्यरुग्ण विभागाच्या वेळेत केलेला बदल स्वागतार्ह आहे. परंतु केस पेपर नोंदणी करण्याच्या अंतिम वेळेत बदल करू नये. मी भांडूप येथे राहते. घरातील सर्व कामे उरकून मला रुग्णालयात येण्यासाठी उशीर होतो. नोंदणी करण्याची वेळ ८ ते ११ असल्याने मला केस पेपर मिळत होता. परंतु नव्या नियमानुसार आता सकाळी ८ ऐवजी ७ वाजता केस पेपर नोंदणी करण्याची मुभा मिळणार आहे. मात्र नोंदणी करण्याची खिडकी एक तास लवकर बंद केल्यास माझ्यासारख्या गृहिणींना व ज्येष्ठ नागरिकांना डॉक्टरांकडे वैद्यकीय तपासणी करून घेणे अवघड होईल. बस, रिक्षामधून येणाऱ्या रुग्णांना अनेकदा वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. त्यामुळे केस पेपर नोंदणीची खिडकी बंद करण्याची वेळ बदलू नये, अशी विनंती शीव रुग्णालयात उपचारासाठी आलेल्या नम्रता जाधव यांनी केली.

हेही वाचा – मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर गुरुवारी दोन तासांचा वाहतूक ब्लॉक

सकाळच्या वेळेत केलेल्या बदलामुळे घरातून लवकर निघावे लागेल. पण या वेळेत जलद लोकल मिळणार नाहीत. माझ्या आईला मधुमेहाचा त्रास आहे, तिला ठरलेल्या वेळेवर खावे लागते. सकाळी लवकर आल्यावर तिच्या खाण्याची व्यवस्था कशी करावी, असा प्रश्न माझ्यासमोर आता निर्माण झाला आहे. रुग्णालयात पोहोचल्यावर आम्हाला नेहमीच डॉक्टरांच्या अनुपस्थितीचा प्रश्न भेडसावत होता. आता तरी नव्या बदलानुसार बाह्यरुग्ण विभागात डॉक्टर वेळेत उपस्थित राहतील का, असा प्रश्न राजावाडी रुग्णालयामध्ये आपल्या आईला उपचारासाठी घेऊन आलेल्या विक्रोळीतील स्वप्निल पवार याने उपस्थित केला.

बाह्यरुग्ण विभाग लवकर सुरू झाल्याने तुलनेत गर्दी कमी होईल. लोकल, टॅक्सीने येणाऱ्या रुग्णांना गर्दी टाळून वेळेत पोहोचता येईल. रुग्णांना रांगेत जास्त वेळ तिष्ठत राहावे लागणार नाही. त्यांचा त्रास कमी होईल. – डॉ. मोहन जोशी, अधिष्ठाता, शीव रुग्णालय

निर्णय स्वागतार्ह आहे, आमच्या रुग्णालयामध्ये ८.३० वाजता बाह्यरुग्ण विभाग सुरू होताे. त्यामुळे रुग्णांना फारसे लवकर यावे लागणार नाही. पण लांबून येणाऱ्या रुग्णांना याचा नक्कीच लाभ होईल.- डॉ. शैलेश मोहीत, अधिष्ठाता, कूपर रुग्णालय

बाह्यरुग्ण विभागात डॉक्टरांची येण्याची वेळ ८ वाजताची करण्यात आली आहे. त्यामुळे रुग्णांची तपासणी करण्यास व त्यांचे निदान करण्यासाठी अतिरिक्त वेळ मिळणार आहे. तसेच रुग्णांची गर्दी कमी होण्यास मदत होईल. याचा रुग्णांना लाभ होईल. – डॉ. सुधीर मेढेकर, अधिष्ठाता, नायर रुग्णालय

Story img Loader