मुंबई : मुंबई महानगरपालिकेने आरोग्य सुविधांवर वर्षभरामध्ये सुमारे ७ हजार कोटी रुपये खर्च केले आहेत. महानगरपालिकेच्या रुग्णालयांमध्ये औषधाची शुन्य चिठ्ठी धोरण राबविण्यासाठी सुमारे २ हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. आरोग्य सुविधेसाठी इतका मोठा निधी खर्च करणारी मुंबई महानगरपालिका देशातील एकमेव महानगरपालिका आहे. नागरिकांना चांगली सुविधा मिळाली पाहिजे, यासाठी विविध प्रकल्प राबविण्यात येत आहेत. आवश्यक सोयी- सुविधांच्या निर्मितीमधून नागरिकांचे जीवन सुसह्य करण्यासाठी शासन काम करीत राहील, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी केले.

नायर दंत महाविद्यालय व रूग्णालयाच्या विस्तारीत इमारतीचा लोकार्पण कार्यक्रम नायर महाविद्यालयाच्या सभागृहात पार पडला. यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी कौशल्य विकास, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, खासदार राहुल शेवाळे, आमदार यामिनी जाधव, महानगरपालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल, अतिरिक्त आयुक्त सुधाकर शिंदे, सार्वजनिक आरोग्य विभागाचे उप आयुक्त संजय कुऱ्हाडे, वैद्यकीय शिक्षण व प्रमुख रुग्णालयाचे संचालक तथा नायर दंत महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. नीलम अंद्राडे आदी उपस्थित होते.

When and where will flood-affected Ektanagari residents be relocated
पूरग्रस्त एकतानगरीचे होणार स्थलांतर नक्की कधी आणि कुठे?
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
Health Department provided assistance to 2 5 lakh critically ill patients mumbai news
आरोग्य विभागाने अडीच लाख दुर्धर आजाराच्या रुग्णांना दिला मदतीचा हात! पॅलिएटीव्ह सेवेचा करणार विस्तार…
43 ministers maharashtra
विश्लेषण : महाराष्ट्रात ४३ मंत्रीच? मंत्रिमंडळात मंत्र्यांची संख्या किती असते? या संख्येवर बंधने का असतात?
Robotic assisted Surgery at Fortis Hospital
हृदयविकाराच्या रुग्णावर केली रोबोटिक गॉलब्लॅडर शस्त्रक्रिया!
Devendra Fadnavis returns as Chief Minister and visits his hometown for first time at 3 pm Thursday
मुख्यमंत्र्यांचे प्रशासनाला १०० दिवसांचे लक्ष्य
What is the National Health Claim Exchange health insurance
आरोग्य विम्याची प्रक्रिया आता जलद? काय आहे ‘नॅशनल हेल्थ क्लेम एक्स्चेंज’?
insurance, Dharavi, 10 crore medical insurance Dharavi,
धारावीतील ३०० हून अधिक रहिवाशांना १० कोटी रुपयांचा वैद्यकीय विमा

हेही वाचा – माढ्यात मोहिते-पाटील शांत; मात्र समर्थक आक्रमक; ‘तुतारी’ वाजू लागली

नायर रुग्णालय दंत महाविद्यालयाची विस्तारित नवीन इमारत एखाद्या पंचतारांकित हॉटेलच्या तोडीची आहे. येथील आरोग्यविषयक सुविधाही तितक्याच अत्याधुनिक व अद्ययावत आहेत. या विस्तारीत इमारतीमुळे रुग्णांना दर्जेदार आरोग्य सुविधा मिळणार आहेत. वैद्यकीय शिक्षण व विद्यार्थी यांचा सार्वभौम विचार करून वसतिगृहासह अन्य सुविधांचा या इमारतीमध्ये समावेश करणे गौरवास्पद असल्याचे एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले. महानगरपालिकेने पायाभूत सुविधांची अनेक कामे हाती घेतली आहेत. उत्तम आरोग्य सुविधेसाठी ७ हजार कोटी रुपये खर्च करण्यात आले आहे. २५० हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरू करण्यात आले आहेत, असेही त्यांनी सांगितले.

हेही वाचा – उदयनराजेंच्या उमेदवारीच्या प्रतीक्षेने साताऱ्यात कार्यकर्ते आक्रमक, भाजपा जिल्हाध्यक्षांनाच घातला घेराव

नायर दंत महाविद्यालयाप्रमाणे महानगरपालिकेची सर्व रुग्णालये आधुनिक सुविधांनी सज्ज बनविण्यात येणार आहेत. केईएम रूग्णालयात बंद पडलेल्या सहा वॉर्डांची दुरूस्ती करून हे वॉर्ड रूग्णांच्या सेवेत दाखल होण्यासाठी सज्ज आहे. यामुळे ३६० खाटांची संख्या वाढली आहे. नायर रुग्णालयाच्या इमारत बांधकामामध्ये २० कोटी रूपयांची बचतही करण्यात आली आहे. औषधाची शुन्य चिठ्ठी धोरणाच्या माध्यमातून विनामूल्य औषध उपलब्ध करून देण्यात येत आहे. यासाठी ३ हजार कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली आहे. औषधांसाठी एवढी मोठी तरतूद करणारी मुंबई ही जगातील पहिली महापालिका आहे. एका वर्षामध्ये आरोग्य यंत्रणेच्या बळकटीकरणासाठी सात हजार कोटी रूपये खर्च करण्यात आले आहेत,असेही ते म्हणाले.

Story img Loader