मुंबई : मुंबईत होणाऱ्या प्रदूषणाविषयी नागरिकांना तक्रार करता यावी यासाठी महानगरपालिकेच्या पर्यावरण विभागाकडून एक मदत क्रमांक उपलब्ध करण्यात आला आहे. त्याचबरोबर छायाचित्रासह प्रदुषणविषयक तक्रार करता यावी यासाठी एक स्वतंत्र व्हॉट्सअॅप क्रमांकही जाहीर करण्यात आला आहे. नागरिकांना खड्ड्यांप्रमाणेच प्रदूषणविषयक तक्रारी मोबाइल क्रमांक ८१६९६८१६९७ वर व्हॉट्सअॅपद्वारे करता येणार आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
मुंबईतील प्रदूषणाचे प्रमाण कमी करण्यासाठी महानगरपालिका प्रशासनाने तयार केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांच्या अंमलबजावणीला आता एक महिना पूर्ण झाला आहे. मुंबईतील हवेचा स्तर बिघडल्यामुळे गेल्या महिन्यात महानगरपालिका प्रशासनाने बांधकामाच्या ठिकाणी अंमलात आणण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली आहेत. मुंबईत मोठ्या प्रमाणात सुरू असलेली बांधकामे आणि त्यामुळे होणारे धूळ प्रदूषण रोखण्यासाठी प्रशासनाने जाहीर केलेल्या मार्गदर्शक तत्वांची अंमलबजावणी न केल्यामुळे महानगरपालिकेच्या विभाग कार्यालयांनी संबंधित बांधकामांना आधी इशारा वजा नोटीसा (इंटिमेशन) धाडल्या होत्या. त्यानंतरही नियम न पाळणाऱ्या बांधकामांना काम थांबविण्याची नोटीसा दिली होती. काम थांबविण्याबाबत दिलेल्या नोटीसची संख्या वाढत असून महानगरपालिकेच्या नियमावलीला फारसे गांभीर्याने घेतले जात नसल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे गेल्या आठवड्यात महानगरपालिका मुख्यालयात मुंबईतील सर्व प्राधिकरणांच्या प्रतिनिधींची बैठक बोलावण्यात आली होती. त्यावेळी शासकीय प्राधिकरणांना पुन्हा एकदा नियमावलीचे पालन करण्याचा इशारा देण्यात आला. न्यायालयाच्या निर्देशानुसार प्रदूषण नियंत्रणासाठी हे नियम तयार करण्यात आले असून त्याचे पालन न करणाऱ्या बांधकामांवर कठोर कारवाई करावी, तसेच वेळप्रसंगी पोलिसात गुन्हे दाखल करावे, असे निर्देश महानगरपालिकेच्या पर्यावरण विभागाने दिले आहेत.
हेही वाचा – मुंबईत वीस टक्के दुकानांच्या पाट्या अद्यापही मराठीत नाहीत
हेही वाचा – २६/११ ला दहशतवादी पाहिल्याचा पोलिसांना दूरध्वनी; माहिती खोटी असल्याचे निष्पन्न
गुन्हे दाखल करताना कोणत्या प्राधिकरणाची हद्द आहे याचा विचार न करता सरळ गुन्हे दाखल करावे, असेही निर्देश देण्यात आले आहेत. त्याचाच पुढचा भाग म्हणून प्रशासनाने आता नागरिकांनाही सहभागी करून घेण्याचे ठरवले आहे.आपल्या परिसरात कुठेही प्रदूषण होत असल्याचे आढळल्यास त्याबाबत तक्रार करण्यासाठी महानगरपालिका प्रशासनाने चार पर्याय उपलब्ध करून दिले आहेत. त्यात मोबाइल ॲप, महानगरपालिकेचे संकेतस्थळ, नागरी मदत क्रमांक आणि एक व्हॉट्सॲप क्रमांक उपलब्ध करण्यात आला आहे. नागरिकांना महानगरपालिकेच्या संकेतस्थळाबरोबरच ‘माय बीएमसी २४ बाय ७’ या मोबाइल ॲपवर किंवा १९१६ या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाच्या मदत क्रमांकावर संपर्क साधता येणार आहे. तसेच ८१६९६८१६९७ या व्हॉट्सॲप क्रमांकावर छायाचित्रासह तक्रार नोंदवता येणार आहे.