मुंबईतील मनेसेचे नेते वृशांत वडके यांना बलात्काराच्या आरोपाखील अटक करण्यात आली आहे. आगामी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत तिकीट मिळवून देतो, असे आमिष दाखवत वेगवेगळ्या ठिकाणी बलात्कार केला, असा आरोप वडके यांच्यावर करण्यात आला आहे.
हेही वाचा >>> शिवसेना-शिंदे गटातील संघर्षानंतर मुंबई पोलिसांची मोठी कारवाई, आमदार सदा सरवणकर यांचं पिस्तूल जप्त
याबाबतचे सविस्तर वृत्त ‘एबीपी माझा’ या मराठी वृत्तवाहिनीने दिले आहे. या वृत्तानुसार मंबई महानगरपालिकेचे तिकीट देतो, असे आमिष दाखवून बलात्कार केल्याचा आरोप मनसेचे नेते वृशांत वडकेंवर करण्यात आला आहे. या आरोपाप्रकरणी वडके यांच्याविरोधात मुंबई पोलिसांनी अटकेची कारवाई केली आहे. वडकेंवर बलात्कारासोबतच धमकावल्याचाही आरोप आहे. मुंबई महापालिका निवडणुकीसाठी तिकीट मिळवून देतो, असे म्हणत गैरफायदा घेतल्याचं एका महिलेने आपल्या तक्रारीत म्हटले आहे.
हेही वाचा >>> करुणा मुंडे भगवान गडावर दसरा मेळावा घेण्याच्या तयारीत, म्हणाल्या “मी २६ वर्षांपासून मुंडे घराण्याची…”
तक्रारीत महिलेने काय म्हटले आहे?
एका ४२ वर्षीय महिलेने वडके यांनी बलात्कार केल्याचा आरोप केला आहे. सप्टेंबर २०२१ ते जुलै २०२२ या कालावधित विविध ठिकाणी शारीरिक संबंध ठेवत वडके यांनी माझी फसवणूक केली.तसेच येणाऱ्या मनपा निवडणुकीत तिकीट मिळवून देण्याचेही आमिष वडकेंनी दाखवले, असा आरोप या महिलेने केला आहे.