बहुप्रतिक्षीत मोनोरेलच्या चाचणीचा गुरुवारी आणखी एक महत्त्वाचा टप्पा पार पडला. आणिक- वडाळा मार्गावर आपत्कालीन परिस्थितीत प्रवाशांना सुखरूप उतरवण्याची कसरत अग्निशमन दल व पोलिसांनी यशस्वीपणे पार पाडली. मोनोरेलची प्रवासी वाहतूक सुरू होण्यासाठी आपत्कालीन चाचणी हा टप्पा महत्त्वाचा होता.
चेंबूर-वडाळा-संत गाडगेमहाराज चौक या सुमारे २० किलोमीटरच्या मार्गावर मोनोरेल धावणार आहे. त्याचा पहिला टप्पा चेंबूर ते वडाळा असा ८. ८ किलोमीटर लांबीचा आहे. जानेवारी २०१४ पर्यंत हा टप्पा सुरू करण्याचा एमएमआरडीएचा प्रयत्न आहे. गुरुवारी मोनोरेलमध्ये अधिकारी-कर्मचाऱ्यांना ‘प्रवासी’ म्हणून बसवण्यात आले. काल्पनिक आपत्कालीन परिस्थितीसाठी अग्निशमन दलाला दूरध्वनी करण्यात आली. त्यानंतर अग्निशमन दलाचे पथक तेथे दाखल झाले व कुठल्याही सार्वजनिक सुविधांना बाधा न पोहोचवता त्यांनी ‘प्रवाशांना’ सुखरूपपणे खाली उतरवले. तब्बल दोन तास ही ‘मॉक ड्रिल’ चालली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा