मुंबई : यंदा पावसाळ्यात २२ दिवस समुद्र किनाऱ्यावर साडेचार मीटरहून अधिक उंचीच्या लाटा उसळणार असून यात जून महिन्यातील ७ दिवस , जुलै महिन्यातील ४ दिवस , ऑगस्ट महिन्यातील ५ दिवस, तर सप्टेंबर महिन्यातील ६ दिवसांची नोंद करण्यात आली आहे. यापैकी सर्वाधिक उंच लाटा या २० सप्टेंबर रोजी मध्यरात्री १ वाजून ३ मिनिटांनी उसळणार असून यावेळी लाटांची उंची ४.८४ मीटर इतकी असेल.

यंदा पावसाळ्यात समुद्रात उसळणाऱ्या उंच लाटांचे दिवस आणि वेळांची यादी महानगरपालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाने नुकतीच जाहीर केली आहे. या यादीनुसार, यंदा पावसाळ्यात एकूण २२ दिवस उंच लाटा उसळणार आहेत.

हेही वाचा…‘महाराष्ट्र दिना’ च्या मुहूर्तावर दोन मराठी चित्रपट आमनेसामने

दरम्यान, मोठ्या भरतीच्या अनुषंगाने महानगरपालिकेकडून वेळोवेळी देण्यात येणाऱ्या सूचनांचे नागरिकांनी काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन महानगरपालिकेच्या आपत्कालीन विभागाकडून करण्यात आले आहे.

अधिक उंचीच्या लाटांचा तपशिल

दिनांक – वेळ – भरतीची उंची

१) २१ ऑगस्ट – दुपारी १२.५७ वा. – ४.८१ मीटर

२) २२ ऑगस्ट – दुपारी ०१.३५ वा. – ४.८० मीटर

हेही वाचा…कोन, पनवेलमधील गिरणी कामगारांचे देखभाल शुल्क लवकरच माफ
३) १९ सप्टेंबर – दुपारी १२.२४ वा. – ४.७८ मीटर
४) २० सप्टेंबर – मध्यरात्री ०१.०३ वा. – ४.८४ मीटर
५) २१ सप्टेंबर – मध्यरात्री ०१.४७ वा. – ४.८२ मीटर

Story img Loader