मुंबई : मुंबईत मोसमी वारे दाखल झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी पावसाचा जोर ओसरला होता.दरम्यान, मुंबईसह पश्चिम उपनगरात शुक्रवारी पहाटेपासून पावसाने हजेरी लावली असून पुढील तीन ते चार तासांत मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

मुंबईत मोसमी वारे दाखल होताच पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यानंतर मात्र, पावसाने विश्रांती घेतली होती. शुक्रवार पहाटेपासून मुंबई तसेच उपनगरांत गडगडाटासह पावसाच्या सरी बरसत आहेत. वांद्रे, दादर, वरळी परिसरात सकाळी ७ वाजल्यापासून ढगांच्या गडगडाटात पावसाला सुरुवात झाली. चार दिवसांचा खंड पडल्यानंतर शुक्रवारी सकाळपासून सुरू झालेल्या पावसामुळे नोकरदारवर्गाची तारांबळ उडाली. दरम्यान, पुढील तीन ते चार तासांत मुंबई तसेच उपनगरांत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.

हेही वाचा…मुंबई महापालिकेवर भगवा फडकविणार; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आत्मविश्वास

मोसमी वाऱ्यांनी कोकण, मराठवाडा तसेच विदर्भाच्या आणखी काही भागात मजल मारली आहे. गुरुवारी मोसमी वाऱ्यांची वाटचाल जैसे थे होती. मोसमी वाऱ्यांचा बंगालच्या उपसागरातील वेग मंदावला आहे. यामुळे पूर्व विदर्भात मोसमी वाऱ्यांची प्रतीक्षा कायम आहे.