मुंबई : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात धरणांच्या परिसरात चांगला पाऊस पडत असून धरणांतील साठ्यात सोमवारी एका दिवसात २१ दिवसांच्या पाण्याची भर पडली. सातही धरणांमध्ये निम्म्याहून अधिक म्हणजेच ५३.१२ टक्के पाणीसाठा जमा झाला आहे.

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या उर्ध्व वैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार, तुळशी या सातही धरणांतील पाणीसाठा सोमवारी ५३.१२ टक्क्यांवर पोहोचला. जुलै महिन्यात कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे सातही धरणांतील पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. मुंबई आणि आसपासच्या परिसरात सोमवारी पडलेल्या पावसामुळे सातही जलाशयांतील पाण्यात भरघोस वाढ झाली असून १९२ दिवस पुरेल इतका पाणीसाठा जमा झाला आहे. धरणक्षेत्रात दमदार पाऊस पडत असून धरणक्षेत्रातील डोंगरातून झिरपणाऱ्या पाण्यामुळे धरणांतील साठ्यात भर पडत आहे.

40 percent increase in hearing problems during Ganeshotsav 2024 mumbai news
गणेशोत्सवादरम्यान श्रवण क्षमतेच्या समस्यांमध्ये ४० टक्क्यांनी वाढ!
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
pune city have no toilets anywhere for people during ganpati visarjan
पुण्याच्या पाहुण्यांची परवड
Sakkardara lake, Nagpur, unsafe,
नागपूरच्या प्रसिद्ध सक्करदरा तलाव परिसर सर्वसामान्यांसाठी असुरक्षित, काय आहेत कारणे?
Permanent reservation, disabled persons,
दिव्यांगांना एसटीच्या सर्व बसगाड्यांमध्ये कायमस्वरूपी आरक्षण
navi Mumbai potholes kopar khairane marathi news
नवी मुंबई : कोपरखैरणे विभाग कार्यालय परिसरातही खड्डे, डासांचा प्रादुर्भाव; नागरिक, कर्मचाऱ्यांना पाठदुखीचा त्रास
Water storage Mumbai, Mumbai dams,
मुंबई : पाणीसाठा ९७ टक्के, पावसामुळे यंदा धरणे काठोकाठ
cases of dengue, Mumbai, chikungunya, lepto,
मुंबईमध्ये हिवताप, डेंग्यू, चिकुनगुन्या, लेप्टोच्या रुग्णांमध्ये वाढ

हेही वाचा – मुंबई : मागाठाण्यात ठाकरे गटाला धक्का, दोन माजी नगरसेविका शिंदे शिवसेनेत

सातही धरणांची पाणी साठवण्याची क्षमता १४ लाख ४७ हजार दशलक्ष लीटर इतकी आहे. त्यातुलनेत सध्या सात धरणांत ७ लाख ६८ हजार ८४७ दशलक्ष लीटर पाणीसाठा जमा झाला आहे. सात जलशयांपैकी तुळशी तलाव कठोकाठ भरला आहे. सर्वात मोठे भातसा धरण ५२ टक्के भरले आहे. तर तानसा धरणदेखील ९१ टक्के भरले आहे.

सात धरणांतून मुंबईला दररोज ३८५० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा केला जातो. तर ठाणे,भिवंडी, निजामपूर मनपा क्षेत्रात दररोज १५० दशलक्ष लीटर पाणीपुरवठा केला जातो.

हेही वाचा – अन् तरुणाने मित्राच्या दिशेने फेकलेलं जॅकेट अडकलं रेल्वेच्या ओव्हरहेड वायरवर; चर्चगेट स्टेशनवरची घटना; गुन्हा दाखल!

पाणी कपात रद्द करण्यासाठी दबाव वाढणार ?

धरणांमधील पाणीसाठ्यात घट झाल्याने खबरदारीचा उपाय म्हणून मुंबई महानगरपालिका प्रशासनाने ५ जूनपासून १० टक्के पाणीकपात लागू केली आहे. मात्र आता धरणांमध्ये ५० टक्क्यांहून अधिक पाणीसाठा असल्यामुळे कपात रद्द करण्याची मागणी होऊ शकते किंवा राजकीय दबावही वाढू शकतो. मात्र ऑगस्टमध्ये पावसाने ओढ दिल्यास पाणीसाठा वाढणार नाही. त्यामुळे महापालिका प्रशासन सावध भूमिका घेत आहे.

कोणत्या धरणात किती पाणीसाठा

उर्ध्व वैतरणा – १८, ४३ टक्के
मोडक सागर – ७५.४६ टक्के
तानसा – ९१. ५५ टक्के
मध्य वैतरणा – ४७.०३ टक्के
भातसा – ५२.०७ टक्के
विहार – ८८.४० टक्के
तुळशी – १०० टक्के