Brihanmumbai Municipal Corporation Budget 2025 : मुंबई महानगरपालिकेचा २०२५-२६ या आर्थिक वर्षातील ७४४२७.४१ कोटी रूपयांचा अर्थसंकल्प अतिरिक्त महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी मंगळवार, ४ फेब्रुवारी रोजी महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्याकडे सादर केला. चालू आर्थिक वर्षाच्या तुलनेत आगामी अर्थसंकल्पाचे आकारमान ९२४६.६२ कोटी रुपयांनी अधिक असून आगामी अर्थसंकल्प १४.१९ टक्क्यांनी अधिक आहे. विविध विकास कामांसाठी ४३१६५.२३ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

चालू आर्थिक वर्षात सुशोभिकरण, रस्त्यांचे सुरू असलेले काँक्रीटीकरण, त्याचबरोबर हाती घेतलेल्या मोठ्या प्रकल्पांसाठी महापालिकेला मोठा निधी खर्च करावा लागला आहे. महापालिकेच्या ठेवी त्यासाठी मोडाव्या लागल्या होत्या. ही बाब लक्षात घेऊन महसूलवृद्धीवर लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे.