नर्सरीसाठी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया
मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या सीबीएसई, आयसीएसई, आयबी आणि केंब्रीज आयजीसीएसई या बोर्डाच्या शाळांतील नर्सरीमधील प्रवेश प्रक्रिया बुधवार, ४ जानेवारीपासून सुरू होणार आहेत. ४ ते २२ जानेवारी या कालावधीत केवळ नर्सरीसाठी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया होणार आहे. गेल्या शैक्षणिक वर्षापासून (२०२१-२२ ) शिक्षण विभागाने महानगरपालिकेच्या शाळांमध्ये सीबीएसईच्या ११ व आयसीएसईची एक शाळा सुरू केली होती.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
माहीमच्या वूलन मिल शाळेत आयसीएसईची शाळा सुरू करण्यात आली होती. या १२ शाळांबरोबरच महानगरपालिकेची पहिली आतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाची म्हणजेच ‘आय.बी.’ शाळा यावर्षी विलेपार्ले येथील दीक्षित रोडवरील महानगरपालिकेच्या शाळेत सुरू झाली. तर केंब्रीज विद्यापीठाशी संलग्नित ‘आय.जी.सी.एस.ई.’ बोर्डची शाळा माटुंगा येथील लक्ष्मीनारायण रोड येथील एल. के. वाघजी शाळेत सुरू झाली. या १४ शाळांमधील नर्सरीच्या वर्गासाठीची प्रवेश प्रक्रिया आजपासून सुरू होत असून महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर प्रवेशासंबंधी अधिक माहिती उपलब्ध करण्यात आली आहे.
मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमध्ये केंद्रीय व आंतराष्ट्रीय मंडळाच्या शाळा सुरू झाल्यापासून विद्यार्थ्यांचा ओघ प्रचंड वाढला आहे. अन्य मंडळांच्या खाजगी शाळांचा खर्च परवडत नसल्यामुळे सर्वसामान्य व गरीब कुटुंबातील मुलांना या शाळांमध्ये जाता येत नाही. त्यामुळे महानगरपालिकेच्या सीबीएसई, आयसीएसई आणि आंतरराष्ट्रीय मंडळाच्या शाळांना पालकांकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे. ऑनलाईन पद्धतीने अर्ज करून मग लॉटरी काढावी जाते. त्यामुळे या प्रवेश प्रक्रियेकडे पालकांचे लक्ष लागलेले असते.
हेही वाचा >>> राणीच्या बागेच्या तिजोरीत सर्वाधिक वार्षिक महसूल, पर्यटकांचाही उच्चांक
या शाळांमध्ये सीबीएसईची शाळा
भवानी शंकर रोड मनपा शाळा, काणेनगर मनपा शाळा, प्रतीक्षानगर मनपा शाळा, दिंडोशी मनपा शाळा, जनकल्याण मनपा शाळा (मालाड), तुंगा व्हिलेज शाळा (कु र्ला), राजावाडी मनपा शाळा (विद्याविहार), अझीझबाग मनपा शाळा (चेंबूर), हरियाली व्हिलेज मनपा शाळा (विक्रोळी पूर्व), मिठागर शाळा (मुलुंड पूर्व)
८७६ जागांसाठी प्रवेश प्रक्रिया होणार
सीबीएसई, आयसीएसई व केंब्रीज मंडळाच्या शाळांमधील प्रत्येक वर्गाची पटसंख्या ४० विद्यार्थी आहे व आयबी मंडळाच्या शाळेमधील प्रत्येक वर्गाची पटसंख्या ३० विद्यार्थी आहे. महापौरांच्या स्वेच्छाधिकाराच्या १० टक्के जागा राखीव असतात तर महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांसाठी पाच टक्के जागा राखीव ठेवण्यात येतात. त्यातून उर्वरित जागांवर ऑनलाईन पद्धतीने प्रवेश प्रक्रिया राबवली जाते, अशी माहिती शिक्षणाधिकारी राजेश कंकाळ यांनी दिली. त्यानुसार सीबीसीएसच्या ११ शाळांमध्ये नर्सरीच्या प्रत्येक तुकडीसाठी ३४ जागा तर केंब्रीज मंडळाच्या शाळेमध्ये ३४ जागा आणि आयबी मंडळाच्या शाळेत २६ जागा अशा नर्सरीच्या एकूण ८७६ जागांसाठी ही प्रवेश प्रक्रिया राबवली जाणार आहे.