मुंबई : मुंबई महानगरपालिकेतील कार्यकारी सहाय्यक लिपिक पदाच्या १८४६ जागांसाठी घेण्यात आलेल्या बहुचर्चित परीक्षेचा निकाल मंगळवार, २५ फेब्रुवारी रोजी जाहीर केला. पालिकेच्या https:// portal. mcgm. gov. in संकेतस्थळावर हा निकाल उपलब्ध आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबई महानगरपालिकेत लिपिक पदासाठी म्हणजेच ‘कार्यकारी सहायक’ पदासाठी भरती करण्याकरीता पालिकेने डिसेंबर महिन्यात राज्यातील विविध जिल्ह्यांमधील केंद्रांवर ऑनलाइन पद्धतीने परीक्षा घेतली होती. ‘कार्यकारी सहायक’ या संवर्गातील १ हजार ८४६ जागा सरळसेवेने भरण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या ऑनलाइन परीक्षेचा निकाल मंगळवारी जाहीर करण्यात आला.

या १ हजार ८४६ पदांसाठी एकूण १ लाख ११ हजार ६३७ उमेदवारांनी अर्ज केला होता. त्यापैकी ९१ हजार २५२ उमेदवारांनी प्रत्यक्ष परीक्षा दिली. या, परीक्षेचा निकाल २५ फेब्रुवारी २०२५ रोजी जाहीर करण्यात आला आहे. एकूण १७३४ पानांचा हा निकाल असून यामध्ये सर्व ९१ हजार २५२ उमेदवारांचा निकाल (गुण) समाविष्ट आहे. मुंबई महानगरपालिकेच्या https://portal.mcgm.gov.in संकेतस्थळावर ‘उज्ज्वल संधीकरिता/ सर्व नोकरीच्या संधी/ प्रमुख कर्मचारी अधिकारी’ या सदरामध्ये हा निकाल उपलब्ध आहे. दरम्यान, भरती प्रक्रियेसंदर्भात वेळोवेळी प्रसिद्ध होणारी माहिती व सूचना महानगरपालिकेच्या संकेतस्थळावरच उपलब्ध करण्यात येईल, असे महानगरपालिका प्रशासनाने कळवले आहे.

‘या’ कारणामुळे परीक्षा वादात

या जागा भरण्यासाठी मुंबई महापालिकेने आधी २० ऑगस्ट रोजी जाहिरात प्रसिद्ध केली होती. या परीक्षेचा अर्ज भरण्यासाठी उमेदवार दहावी आणि पदवी परीक्षा पहिल्या प्रयत्नात किमान ४५ टक्के गुण घेऊन उत्तीर्ण झालेला असावा अशी अट घातली. महाराष्ट्रात आतापर्यंत कोणत्याही परीक्षेसाठी अशी अट घातली नाही. त्यामुळे ही अट काढून टाकावी, अशी मागणी सर्व स्तरातून होत होती. कामगार संघटनांनीही हा विषय लावून धरला होता. आमदार आदित्य ठाकरे यांनी ही मागणी केली होती.