मुंबई : मुंबई शहरातील नवी बांधकामे आणि बांधकामातील टाकाऊ साहित्य (राडारोडा) तसेच किरकोळ घरदुरुस्तीतून निर्माण होणाऱ्या साहित्याच्या विल्हेवाटीसाठी पालिकेने यंत्रणा उभारली आहे. त्यासाठी दहिसर आणि कल्याण शिळ फाटा येथे दोन प्रकल्प सुरू करण्यात आले आहेत. संकलित राडारोड्याचा चुरा करून त्याचा पुनर्वापर केला जाईल. प्रति दिन १,२०० टनांची क्षमता असलेला हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा प्रकल्प आहे. हा प्रकल्प नोव्हेंबरपासून सुरू झाला.

जुन्या इमारतींचे पाडकाम किंवा घरातील दुरुस्तीच्या कामांमुळे निर्माण होणारा राडारोडा हटवण्यासाठी पालिकेकडे गेली काही वर्षे कोणतीही ठोस यंत्रणा नव्हती. राडारोडा टाकण्यासाठी कोणतीही यंत्रणा नव्हती. त्यामुळे मुंबईत बऱ्याचदा रात्रीअपरात्री कुठेही राडारोडा टाकला जात होता. पालिकेने आता राडारोडा संकलित करण्यासाठी आणि त्याच्या विल्हेवाटीसाठी कंत्राटदार नेमले आहेत.

हेही वाचा – मुंबईसह ठाणे, भिवंडीत १४, १५ डिसेंबर रोजी १५ टक्के पाणीकपात

राडारोडा संकलन, वाहतूक आणि त्यावरील शास्त्रोक्त प्रक्रिया, त्यासाठी जागा मिळवून प्रकल्प उभारणी, मनुष्यबळ आणि संयंत्रांची जबाबदारी कंत्राटदारावर सोपविण्यात आली आहे. पालिकेवर प्रकल्प जागा, भांडवली गुंतवणूक, परिरक्षण आणि तत्सम भांडवली बाबींच्या खर्चाचा भार आलेला नाही.

या कंत्राटदारांच्या प्रकल्पांत राडारोडा नेल्यावर त्या ठिकाणी त्यावर शास्त्रोक्त प्रक्रिया केली जाईल. त्यातून तयार होणारे वाळूसदृश घटक फरसबंदी (पेव्हर ब्लॉक, दुभाजक, पदपथांसाठी लागणारे दगड, बाके (बेंच) यांसारख्या संरचनाविरहित (नॉन स्ट्रक्चरल) बाबींच्या निर्मितीसाठी संबंधित उद्योगांना वापरात येऊ शकतील. ही जबाबदारी संबंधित कंत्राटदारांवर सोपवण्यात आली आहे.

हेही वाचा – Mumbai Local Train : वीज पुरवठ्यात तांत्रिक बिघाडामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत; कर्जत, कसारा मार्गावरील सेवा १५ ते २० मिनिटे उशीराने

दररोज १२०० टन

मुंबई शहर (कुलाबा ते शीव) व पूर्व उपनगरांसाठी (कुर्ला ते मुलुंड) मेसर्स मेट्रो वेस्ट हॅण्डलिंग प्रा. लि. यांची नियुक्ती. प्रकल्प शिळ फाटा, डायघर गाव येथे पाच एकर जागेवर स्थित. या प्रकल्पाची प्रक्रिया क्षमता प्रति दिन ६०० टन

● पश्चिम उपनगरांसाठी (वांद्रे ते दहिसर) मेसर्स एजी एनव्हायरो इन्फ्रा प्रा. लि. यांची नियुक्ती. त्यांचा प्रकल्प दहिसर, कोकणीपाडा येथे पाच एकर जागेवर स्थित. या प्रकल्पाची प्रक्रिया क्षमता प्रति दिन ६०० टन

● दोन्ही कंत्राटदारांची एकत्रित सेवा लक्षात घेता, प्रति दिन १२०० टन राडारोड्यावर प्रक्रिया

प्रकल्प तपशील

● दोन्ही प्रकल्पांसाठी २,०६५ कोटी खर्च

● दहिसर येथील प्रकल्पासाठी १०२४ कोटी, पूर्व उपनगरांसाठी १,०३१ कोटींचे कंत्राट

● प्रति दिन ६०० मेट्रिक टन राडारोड्यावर प्रक्रिया

● दरवर्षी पाच टक्के वाढ गृहीत धरून २० वर्षांसाठी कंत्राट

Story img Loader