लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : मुंबईतील वाढत्या प्रदूषणावर नियंत्रण मिळवण्यासाठी एका बाजूला मुंबई महानगरपालिकेने नियमावली आणलेली असताना दुसरीकडे मात्र अनधिकृतपणे राडारोडा वाहून नेणाऱ्या वाहनांवर कोणतीही कारवाई होत नसल्याचे आढळून आले आहे. अनधिकृतपणे राडारोडा वाहून नेणाऱ्या वाहनांवर केवळ दंडात्मक कारवाई केली जाते. मात्र दंड भरून ही वाहने पुन्हा रस्त्यावर फिरत असतात. त्यामुळे अनधिकृतपणे राडारोडा वाहून नेणाऱ्या वाहनांची नोंदणी रद्द करावी, अशी विनंती महानगरपालिका प्रशासनाने परिवहन आयुक्तांना केली आहे.

London–Calcutta bus service
London–Calcutta bus service: लंडन ते कलकत्ता, सर्वाधिक लांबीचा बससेवा मार्ग; कुणी चालवली ही बससेवा? कुणासाठी?
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
ATM money theft pune, thief caught pune,
पुणे : एटीएममधून रोकड चोरणाऱ्या चोरट्याला पकडले; सुरक्षारक्षक, वाहतूक पोलिसांची तत्परता
Will Ramdas Athawale take care of BJP or Republican workers
रामदास आठवले भाजपला सांभाळणार की रिपब्लिकन कार्यकर्त्यांना?
oil india limited portfolio
माझा पोर्टफोलियो : पोर्टफोलिओला महारत्नाची जोड
maharashtra assembly election 2024 uddhav thackeray hoarding
‘प्रकल्प रोखणारे सरकार’ला ठाकरे गटाचे फलकबाजीतून उत्तर
congress mp abhishek manu singhvi remarks on cji chandrachud
चंद्रचूड यांच्या कार्यकाळात सत्तासंघर्षाचा निकाल लांबणीवर पडणे अतर्क्य ; सिंघवी
crores of rupees seized from car in khed shivapur toll naka area
अन्वयार्थ : हजार कोटी सापडले, त्याचे पुढे काय झाले?

मुंबईत गेल्या काही दिवसांपासून हवेचा स्तर बिघडला आहे. प्रदूषण वाढण्यास मुख्यतः धूळ कारणीभूत असल्यामुळे बांधकाम क्षेत्रासाठी महानगरपालिकेने नुकतीच नियमावली जाहीर केली आहे. तसेच बांधकामाचा राडारोडा वाहून नेणाऱ्या वाहनांसाठीही नियम घालून दिले आहेत. त्यावर लक्ष ठेवण्याची जबाबदारीही परिवहन आयुक्तांवर सोपवली आहे. मात्र मुंबईत विशेषतः मालाड परिसरात अनधिकृतपणे राडारोडा वाहून नेणाऱ्या ट्रकची रात्रीच्या वेळी मोठ्या प्रमाणावर ये-जा होत असते. मढ मार्वे येथे मोठ्या प्रमाणावर अनधिकृतपणे भरणी केली जात असते. त्यामुळे अशा वाहनांवर महानगरपालिकेच्या पी उत्तर विभाग कार्यालयाच्यावतीने नियमित कारवाई केली जाते. यावर्षी गेल्या दहा महिन्यात अशा ५० हून अधिक वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.

आणखी वाचा-मुंबई: खोटी माहिती देणारे, धमकीच्या दूरध्वनींची वाढती डोकेदुखी

कोणत्याही परवानगीशिवाय राडारोडा वाहून नेणे, तसेच राडारोडा झाकलेला नसणे अशी अनियमितता आढळून येत असते. त्यामुळे या परिसरात प्रदूषणही वाढले आहे, तसेच या वाहनांची चाकेही चिखलाने माखलेली असल्यामुळे रस्ते खराब होतात, रस्त्यावर माती पसरते, ट्रकच्या वर्दळीमुळे रस्त्यावर खड्डे पडतात, असे अनेक त्रास येथील नागरिकांना सोसावे लागतात. मात्र महानगरपालिका प्रशासनाला या गाड्यांवर केवळ दंडात्मक कारवाईचे अधिकार आहेत. त्यामुळे दंड भरून या गाड्या पुन्हा अनधिकृतपणे राडारोडा वाहून नेण्याचे काम अनधिकृतपणे करीत राहतात. त्यामुळे अशा गाड्यांची नोंदणी रद्द करण्याची किंवा परिवहन विभागाच्या नियमानुसार अधिक कडक कारवाई करण्याची मागणी महानगरपालिकेच्या पी उत्तर विभागाने केली आहे. पी उत्तर विभाग कार्यालयाने परिवहन उपायुक्तांना पत्र लिहून तशी कारवाईची मागणी केली आहे.

मालाड परिसरात मढ मार्वे सारख्या भागात कांदळवनांमध्ये भरणी टाकून अनधिकृत बांधकामे करण्याचे प्रमाण मोठे आहे. एका बाजूला कांदळवनांचा ऱ्हास होतो. त्यामुळेही प्रदूषण वाढत असते. हा राडारोडा अनधिकृतपणे वाहून नेणाऱ्या वाहनांवर परिवहन विभागाने कारवाई केल्यास अशा वाहनचालकांवर व राडारोड्याची वाहतूक करण्यावर आणि भरणी घालण्यावरही वचक बसेल, असे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.