मुंबई : ईद निमित्त देवनारच्या पशुवधगृहात आणण्यात येणाऱ्या म्हैसवर्गीय प्राणी आणि बकऱ्यांचे ईअर टॅगिंग करण्याचे आदेश मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी दिले असून त्याची अंमलबजावणी करण्याची तयारी सुरू आहे. त्यासाठी राज्य सरकारच्या पशुसंवर्धन विभागाला महानगरपालिकेमार्फत उपकरणे आणि मनुष्यबळ उपलब्ध करण्याची सूचनाही आयुक्तांनी केली आहे.

महाराष्ट्र पशुसंवर्धन कायदा, १९७६ (सुधारित १९९५) अन्वये अतिरिक्त पशुधन विकास अधिकारी बकरी ईदच्या कालावधीत म्हैसवर्गीय प्राण्यांच्या तपासणी करण्यासाठी संगणक आणि डेटा एंट्री ऑपरेटर्स उपलब्ध करून देण्यात आले आहेत. पशुसंवर्धन विभागाने प्राण्यांच्या आरोग्य तपासणीसाठी ३० डॉक्टर उपलब्ध करण्यात आले आहेत. तसेच, बकऱ्यांची मोठी संख्या पाहता ईअर टॅगिंगच्या प्रक्रियेतून शासनामार्फत सवलत मिळवण्यासाठीचा पाठपुरावा महानगरपालिकेमार्फत करण्यात येत आहे.

edible oil import india
खाद्यतेलात आत्मनिर्भर होण्याच्या घोषणा हवेतच ! जाणून घ्या, एका वर्षात किती खाद्यतेलाची आयात झाली आणि त्यासाठी किती रुपये मोजले
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
flat Palava Colony animals, Dombivli Palava Colony animals, Dombivli flat animals
डोंबिवली पलावा वसाहतीमधील अलिशान सदनिकेतून विदेशी वन्यजीव जप्त, ठाणे वन विभागाची कारवाई
Nurses without pay for four months Mumbai print news
परिचारिका चार महिने वेतनाविना
Onion producers suffer due to losses consumers suffer due to price hike nashik news
नुकसानीमुळे कांदा उत्पादक, तर दरवाढीमुळे ग्राहक त्रस्त; कांदा शंभरीवर
stray dogs dead
कांदिवलीमध्ये १४ भटक्या कुत्र्यांचे मृतदेह
Viral Video Shows Pet Dog Help Her Owner
मैं हूँ ना…! मालकिणीला मदत करण्यासाठी श्वानाची धडपड; काठी काढण्यासाठी मारली उडी अन्… पाहा VIRAL VIDEO

हेही वाचा: मुंबई: संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात नव्या पक्ष्याची नोंद; व्हाईट – बिलिड सी – ईगलचे दर्शन

यंदा बकरी ईदनिमित्त देवनार पशुवधगृह येथे पुरविण्यात येणाऱ्या सेवा – सुविधांसाठी एक हजारांहून अधिक कर्मचारी तैनात करण्यात येणार असून या परिसरातील कचऱ्याचे निर्मूलन, सुरक्षा व्यवस्था, आरोग्य सेवा, कीटकनाशक विभाग, रूग्णवाहिका, आपत्कालीन व्यवस्थापनासाठी फायर मार्शल, तक्रार निवारण कक्ष, माहिती व तंत्रज्ञान आदी विभागांचे अधिकारी, कामगार व इतर कर्मचारी या कालावधीत कार्यरत असणार आहेत. बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर देवनार पशुवधगृहात विविध सेवा – सुविधांसह पालिका प्रशासन सज्ज झाले असून या कामांच्या पूर्वतयारीचा अतिरिक्त आयुक्त अश्विनी जोशी यांनी बुधवारी घेतला. बकरी ईदनिमित्ताने देवनार पशुवधगृहात सर्व प्रकारच्या व्यवस्थांचे चोख नियोजन करत प्रत्येक विभागाने आपापली जबाबदारी योग्यरीत्या पार पाडावी. तसेच, यंत्रणांनी आपआपसात उत्तम समन्वय साधावा, असे आदेश अश्विनी जोशी यांनी दिले आहेत. ईदच्या कालावधीत पाऊस कोसळण्याची शक्यता, नागरिकांची होणारी गर्दी, प्राण्यांची संख्या, तसेच उपहारगृह आदी सुविधा देताना सुरक्षिततेला प्राधान्य देण्याच्या सूचनाही त्यांनी यंत्रणांना केली.

हेही वाचा: डोंगर उतारावर राहणाऱ्यांनी सुरक्षितस्थळी स्थलांतरित व्हावे, मुंबई महानगरपालिका प्रशासनाचे आवाहन

ईदच्या कालावधीत देवनार पशुवधगृह येथे विक्रीसाठी सुमारे दीड लाख ते दोन लाख बकरे आणि १२ हजार ते १५ हजार म्हैसवर्गीय प्राणी आणण्यात येतात. बकऱ्यांची मोठी संख्या पाहता या कालावधीत ईअर टॅगिंगची प्रक्रिया हे यंत्रणेसमोरील मोठे आव्हान आहे. बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेच्या देवनार पशुवधगृहात ५ ते १९ जून या कालावधीत जिवंत म्हैसवर्गीय प्राणी आणि बकऱ्यांच्या बाजाराचे आयोजन करण्यात येणार आहे. यासाठी बकरी ईदच्या दिवशी आणि त्यानंतरचे दोन दिवस धार्मिक पशुवध परवानगी देण्यात आली आहे. ‘धार्मिक पशुवध धोरणाच्या अधीन राहूनच बकऱ्यांबाबत धार्मिक पशुवधासाठी परवानगी देण्यात येते. तसेच, दरवर्षी म्हैसवर्गीय प्राण्यांचा धार्मिक वध हा केवळ देवनार पशुवधगृहातच करणे अपरिहार्य आहे.

परवाना व स्लॉट बुकिंगसाठी ऑनलाइन व्यवस्था

देवनार पशुवधगृहात धार्मिक पशुवधासाठी अर्ज स्वीकारणे, परवानगी देणे, म्हैसवर्गीय प्राणी व बकरे आयात परवाना व स्लॉट बुकिंगसाठी ऑनलाईन व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच, माहिती व तंत्रज्ञान विभागामार्फत डिजिटायजेशनच्या प्रक्रियेसाठी संगणक तसेच डेटा एंट्री ऑपरेटरदेखील उपलब्ध करून देण्यात आले आहेत. या ठिकाणी सुरक्षेच्या दृष्टीने २१० डोम कॅमेरा, ६ पीटी झेड, व्हिडिओ वॉलसह सीसी टीव्ही यंत्रणाही कार्यरत असेल.

हेही वाचा: लग्नाचा खर्च परत मिळविण्यासाठी जावयाचे अपहरण

बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेकडून उपलब्ध करण्यात आलेल्या सोई-सुविधा

१. बकरी ईदच्या १५ दिवसांच्या कालावधीदरम्यान देवनार पशुवधगृहात अंदाजे ७ हजार ५०० दशलक्ष टन कचऱ्यांचे निर्मूलन करण्यासाठी रोज ३०० कामगार, ५ पिकअप व्हॅन, २ जेसीबी, ४ डंपर, मृत जनावरे वाहून नेण्यासाठी ४ वाहनांची व्यवस्था करण्यात आली आहे.

२. नागरिकांसाठी परिसरातील २५० सुविधा केंद्रांसह ८१ मोबाईल शौचालयांचीही व्यवस्था करण्यात येत आहे.
३. व्यापाऱ्यांची नोंदणी व प्राण्यांचे आवक-जावक व्यवस्थापन करण्यासाठी क्यूआर कोड यंत्रणेचा वापर करण्यात आला आहे.
४. नागरिकांसाठी २ आरोग्य केंद्र आणि ४ रुग्णवाहिका तसेच जनावरांसाठी २ प्रथमोपचार केंद्रांची व्यवस्था करण्यात येत आहे.
५. नागरिकांच्या तक्रार निवारण व आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी २४ तास कार्यरत नियंत्रण कक्ष असेल. तसेच, नागरिकांना मदतीला ९९३०५०१२९४ हेल्पलाईन उपलब्ध आहे.
६. प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्त्वावर प्राण्यांना निवारे उपलब्धतेनुसार वाटप करण्यात येणार आहेत.