मुंबई : अतिमुसळधार पावसाने मुंबई शहरासह दोन्ही उपनगरांना सोमवारी झोडपून काढले. या कालावधीत अनेक ठिकाणी वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली होती. तसेच, लोकल सेवाही ठप्प झाली होती. परिणामी, अनेक रेल्वे स्थानकांवर मोठ्या संख्येने प्रवासी अडकले होते. मुंबई महानगरपालिकेने ताटकळत लोकलची वाट पाहणाऱ्या प्रवाशांना मदतीचा हात देत चहा, पाणी, बिस्कीट तसेच इतर खाद्यपदार्थांचे वाटप केले.

हेही वाचा : बेस्टच्या ताफ्यात स्वमालकीच्या केवळ ३५ टक्के गाड्या

मुंबई शहर आणि उपनगरांत रविवारी रात्रीपासून सोमवारी सकाळपर्यंत झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणे जलमय झाली. परिणामी, अनेक ठिकाणी वाहतूक अन्य मार्ग वळविण्यात आली. अनेक ठिकाणी प्रचंड वाहतूक कोंडी झाली. रेल्वे रुळांवर पाणी साचल्याने लोकल सेवा ठप्प झाली. तर, काही ठिकाणी अतिशय संथ गतीने लोकल धावत होत्या. त्यामुळे स्थानकांवर प्रवाशांची प्रचंड गर्दी झाली होती. रेल्वे स्थानकात अनेक तास ताटकळत राहिल्याने अनेकजण तहान – भुकेने व्याकुळ झाले होते. त्यामुळे महानगरपालिका प्रशासनाने सीएसएमटी रेल्वे स्थानकात प्रवाशांना खाद्यपदार्थ, चहा, बिस्कीट आणि पिण्याच्या पाण्याचे वाटप केले.

Story img Loader