लोकसत्ता प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबई : दादर येथील सिद्धिविनायक मंदिरालगतच्या अनधिकृत दुकानांवर गुरुवारी पालिकेच्या ‘जी उत्तर’ विभागाने कारवाई केली. या कारवाईदरम्यान तीन दुकाने जमीनदोस्त करण्यात आली.

डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात पालिका अतिरिक्त आयुक्त अश्विनी जोशी यांच्या अध्यक्षतेखाली अतिक्रमण प्रतिबंध समितीची बैठक पार पडली होती. यावेळी त्यांनी मुंबईत ठिकठिकाणची अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त करण्याचे आदेश यंत्रणांना देण्यात आले होते. त्यानुसार पालिकेच्या विविध विभागांमध्ये अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यास सुरुवात झाली आहे. नुकत्याच सिद्धिविनायक मंदिर परिसरात ‘जी उत्तर’ विभागाने केलेल्या कारवाईत तीन अनधिकृत दुकाने पाडण्यात आली. पालिका प्रशासनाने २०१९ मध्येही संबंधित दुकानांवर कारवाई केली होती. मात्र, पुढील काही कालावधीतच पुन्हा या जागेवर अनधिकृत दुकाने उभी राहिली. ही बाब निदर्शनास येताच पालिकेने गुरुवारी पुन्हा या दुकानांवर कारवाई केली.

आणखी वाचा-सर्वसामान्य प्रवाशाची थेट महाव्यवस्थापकाकडे तक्रार, पाण्याच्या कमतरतेमुळे शौचालय अस्वच्छ

या कारवाईत पालिकेच्या ‘जी उत्तर’ विभागातील ५० कामगार, कर्मचारी, अधिकारी सहभागी झाले होते. यावेळी पालिकेच्या परिरक्षण, अनुज्ञापन व इतर विभागांतील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. कारवाईदरम्यान दादर पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी, कर्मचारी तैनात होते.