मुंबई : मुंबईचा कोंडलेला श्वास मोकळा करून मुंबईकरांना शुद्ध हवा उपलब्ध व्हावी, यासाठी मुंबई महापालिकेने महत्त्वाची पावले उचलण्यास सुरूवात केली आहे. मुंबईत धावणाऱ्या ३५० बसगाडय़ांवर हवा शुद्धीकरण यंत्रे बसविण्यात येणार असून,  सहा उपाययोजना करण्यात येणार आहेत.गेल्या अनेक दिवसांपासून मुंबईतील हवेचा दर्जा खालावला आहे. मुंबईत सुरू असलेली विकासकामे, इमारतींची बांधकामे, वाहनांचा धूर, कारखान्यातून निघणारा धूर आदींमुळे मुंबईकरांना श्वास घेणे अवघड झाले आहे. पालिकेने बांधकाम व्यावसायिकांसह संबंधितांना मार्गदर्शक सूचनाही केल्या आहेत. मात्र, या उपाययोजनांचा अद्याप फारसा प्रभाव पडला नसल्याचे दिसून येत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

त्यामुळे हवा शुद्धीकरणासाठी पालिकेने आणखी उपाययोजना करण्याचा निर्णय घेतला आहे. हवा प्रदूषण रोखण्यासाठी पालिका आयआयटी, मुंबईची मदत घेणार आहे. आयआयटीकडून हवा शुद्धीकरणासाठी प्रायोगिक तत्वावर ६ यंत्रे मागविण्यात येणार आहेत. मुंबईत धावणाऱ्या ३५० बसगाडय़ांवर हवा शुद्धीकरण यंत्रे बसविण्यात येणार असून, यापैकी १५० बसगाडय़ावर ही यंत्रे बसविण्यात आली आहेत, अशी माहिती मुंबई शहर पालकमंत्री दीपक केसरकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. वायू या कंपनीने तयार केलेले पदपथावरील दिवे ५० ठिकाणी कार्यान्वित केले जाणार असून, या दिव्यांमध्ये हवा शुद्धीकरण यंत्रणा बसविण्यात आली आहे. चेंबूर येथील डायमंड गार्डन, वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान येथे हे दिवे बसवले जातील.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbai municipal corporation has installed air purifiers on 350 buses in mumbai amy