मुंबई : पावसाळ्यात उद्भवणाऱ्या साथीच्या आजारांना प्रतिबंध करण्यात मुंबई महानगरपालिकेचा आरोग्य विभाग अपयशी ठरत असल्याचे दिसत असून जूनच्या तुलनेत जुलैत साथीच्या आजारांच्या रुग्णांत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. मुंबईत जूनमध्ये साथीच्या आजाराचे १३९५ रुग्ण सापडले होते. जुलैत त्यात दुपटीने वाढ झाली आहे.

जुलैत ३०४४ रुग्ण सापडले आहेत. त्यात गॅस्ट्रो, मलेरिया, डेंग्यू, कावीळ, स्वाईन फ्लू आणि लेप्टो या आजारांच्या रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार जुलैत ३ हजार ४४ रुग्ण सापडले आहेत. जूनमध्ये महिन्याभरात सापडलेल्या १ हजार ३९५ रुग्णांच्या तुलनेत जुलैत अधिक रुग्ण सापडले आहेत. जुलैत मुंबईतील साथीच्या आजारांमध्ये गॅस्ट्रोचे सर्वाधिक १२३९ रुग्ण सापडले असून त्याखालोखाल हिवताप ७९७ रुग्ण, डेंग्यू ५३५ रुग्ण, स्वाईन फ्लू १६१ रुग्ण, कावीळ १४६ रुग्ण, लेप्टोचे १४१ रुग्ण तर चिकुनगुन्याचे २५ रुग्ण सापडले आहेत. जूनच्या तुलनेत जुलैमध्ये मोठ्या प्रमाणात झालेल्या पावसामुळे साथीच्या आजाराच्या रुग्णांमध्ये वाढ झाल्याचे दिसून येत असल्याचे मत वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात आले आहे.

pune gbs loksatta news
पुण्यात गेल्या वर्षभरात आढळले ‘जीबीएस’चे १८५ रुग्ण; आरोग्य विभागाच्या आकडेवारीतून माहिती समोर
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
One GBS patient detected in Sangli city and five to six in rural areas all receiving treatment in private hospitals
सांगलीत ‘जीबीएस’चे सहा रुग्ण आढळले, आरोग्य यंत्रणा सतर्क, उपचार सुरू
loksatta anvyarth quality of school students has deteriorated clear from the asar survey
अन्वयार्थ: कोविडोत्तर निरीक्षणांच्या इयत्ताबदलाचा ‘असर’!
Symptoms and Treatment of Guillain-Barré Syndrome in Pune
Guillain-Barre Syndrome Pune: पुणेकरांना पिण्याच्या पाण्याबाबत पालिका आयुक्तांचं ‘हे’ आवाहन; जीबीएसचा उल्लेख करत म्हणाले…
Guillain Barre syndrome outbreak in Pune
Guillain Barre Syndrome :‘जीबीएस’ची रुग्णसंख्या ७३ वर; ३० जण आयसीयूमध्ये तर १४ जण व्हेंटिलेटरवर
niv test reveals the root cause of rare guillain barre syndrome disorder
‘एनआयव्ही’च्या तपासणीतून अखेर दुर्मीळ ‘जीबीएस’ विकाराचे मूळ कारण उघड; कशामुळे धोका जाणून घ्या…
Pune city pimpri chinchwad Guillain Barre Syndrome patient ventilator ICU
पुण्यात गुइलेन बॅरे सिंड्रोमचे रुग्ण आणखी वाढले; १३ जण व्हेंटिलेटरवर तर २४ जण आयसीयूत दाखल

हेही वाचा – बोरिवली रेल्वे गोळीबार प्रकरणः आरोपीला फाशीचीच शिक्षा झाली पाहिजे, मृताच्या नातेवाईकांची मागणी

मुंबईतील रुग्णांची संख्या

आजार – जून – जुलै

मलेरिया – ४४३ – ७९७

डेंग्यू – ९३ – ५३५

लेप्टो – २८ – १४१

गॅस्ट्रो – ७२२ – १२३९

कावीळ – ९९ – १४६

चिकनगुनिया – ० – २५

स्वाईन फ्लू – १० – १६१

हेही वाचा – जुलैमध्ये मुंबईत बारा हजारांहून अधिक घरांची विक्री

राज्यात आठवड्याभरात हिवतापाचे १५०० तर डेंग्यूचे ८१४ रुग्ण

राज्यामध्ये हिवताप व डेंग्यूच्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत असून, आठवडाभरामध्ये राज्यामध्ये हिवतापाचे १५७८ रुग्ण तर डेंग्यूचे ८१४ रुग्ण सापडले आहेत. हिवतापाचे सर्वाधिक गडचिरोलीमध्ये २६६ रुग्ण, मुंबईमध्ये २४९ रुग्ण आणि चंद्रपूरमध्ये ७६ रुग्ण सापडले. तसेच डेंग्यूचे सर्वाधिक मुंबईमध्ये १८३ रुग्ण सापडले असून, त्याखालोखाल नाशिक ७७ रुग्ण, कोल्हापूर ६१ रुग्ण, पालघर २९ रुग्ण सापडले आहेत.

Story img Loader