मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या कामासाठी सरकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात येते. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेच्या पाच वैद्यकीय महाविद्यालये व अन्य उपनगरीय रुग्णालयांतील सुमारे ३० टक्के कर्मचाऱ्यांची नियुक्ती निवडणुकीच्या कामासाठी करण्यात आली आहे. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेतील आरोग्य सेवेवर परिणाम होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

मराठा आरक्षणासाठी करण्यात आलेल्या सर्वेक्षणानंतर शीव, नायर, कूपर, केईएम आणि नायर दंत महाविद्यालयाबरोबर आरोग्य विभागातील सुमारे ८०० कर्मचाऱ्यांची निवडणुकीच्या कामासाठी नियुक्ती करण्यात आली आहे. यामध्ये प्रशासकीय कर्मचाऱ्यांबरोबरच निम्न वैद्यकीय कर्मचारी व तंत्रज्ञांचा समावेश आहे. महानगरपालिकेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, केईएम रुग्णालयातील १३० कर्मचारी, शीव रुग्णालयातील ११० कर्मचारी, नायर रुग्णालयातील १०० कर्मचारी, कूपर रुग्णालयातील ३० आणि नायर दंत महाविद्यालयातील १०० कर्मचारी आणि आरोग्य विभागातील २०० कर्मचाऱ्यांची निवडणुकीच्या कामासाठी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे रुग्णालयातील आरोग्य सेवेवर परिणाम होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. रुग्णालयातील प्रयोगशाळा तंत्रज्ञांची निवडणुकीच्या कामावर नियुक्ती केल्याने रुग्णांना रक्त, सीटी स्कॅन, एमआरआयचे अहवाल मिळण्यास विलंब होत आहे. तसेच परिचारिकांची नियुक्ती केल्यामुळे त्याचा परिणाम थेट रुग्ण सेवेवर होण्याची चिन्हे आहेत. तसेच प्रशासकीय कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आल्याने सुट्टीचे अर्ज, सेवानिवृत्तीची काम रखडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Guillain Barre syndrome treatment
‘जीबीएस’च्या उपचारांवरून आमदारांची नाराजी, अवास्तव दर आकारणाऱ्या रुग्णालयांवर कारवाईचा इशारा
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
registration process for mh nursing cet 2025 exam started
MH BSc Nursing CET 2025: बीएस्सी नर्सिंगसह परिचारिका संवर्गातील अभ्यासक्रमांची नोंदणी सुरू
complaint filed at Nagpur AIIMS against surgery head for harassing assistant professor
विभाग प्रमुखाकडून सहाय्यक प्राध्यापकाचा छळ… नागपूर एम्समध्ये…
process of getting assistance from the Chief Ministers Relief Fund will be paperless
मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षातून मदत मिळविण्याची प्रक्रिया होणार पेपरलेस!
Illustration showing Indian companies facing challenges in hiring skilled talent.
Unskilled Employees : भारतातील ८० टक्के कंपन्यांना मिळेनात कुशल कर्मचारी, आयटी आणि आरोग्य क्षेत्रासमोर आव्हानांचा डोंगर
मुंबई : नायर रुग्णालयातील रोजंदारी कर्मचारी तीन महिने वेतनापासून वंचित, ७४ कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ
मुंबई : नायर रुग्णालयातील रोजंदारी कर्मचारी तीन महिने वेतनापासून वंचित, ७४ कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ
1 5 lakh senior citizen treated by the Maharashtra state public health department Mumbai print news
वृद्धापकाळातील आरोग्य सेवा गतिमान करणार! वर्षभरात साडेदहा लाख वृद्धांवर उपचार…

हेही वाचा : गोष्ट मुंबईची – भाग १४८ : झिप- झॅप- झूम… वरळी ते मरिन लाइन्स केवळ १० मिनिटांत!

निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार कर्मचाऱ्यांना निवडणुकीच्या कामासाठी पाठविणे अनिवार्य आहे. परंतु आराेग्य विभागातील कर्मचाऱ्यांना निवडणुकीच्या कामावर पाठवताना सेवेवर कोणताही परिणाम होणार नाही व रुग्णांना त्रास होणार नाही, याची आम्ही काळजी घेण्यात येत असल्याचे मुंबई महानगरपालिकेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

Story img Loader