लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : निर्धारित कालावधीमध्ये कर भरणा करण्यास टाळाटाळ करणाऱ्या, तसेच आर्थिक क्षमता असूनही मालमत्ताकर न भरणाऱ्या मोठ्या थकबाकीदारांना मुंबई महानगरपालिकेने कलम २०३ अन्वये जप्तीची नोटीस बजावली आहे. विहीत मुदतीत कर भरणा न केल्यास मुंबई महानगरपालिका अधिनियमातील तरतुदीनुसार सदर मालमत्तेवर कलम २०४, २०५, २०६ अन्वये प्रथमतः मालमत्तेतील चीज वस्तू जप्त करून लिलाव केला जाईल. जप्त चीज वस्तुतूनही कर वसूल झाला नाही तर, कलम २०६ अन्वये मालमत्तेचा लिलाव करण्यात येईल, असे नोटीसीद्वारे स्पष्ट करण्यात आले आहे.

Navi Mumbai Municipal Corporation Encroachment Department takes action against illegal constructions in Nerul and Ghansoli
नेरुळ, घणसोलीतील बेकायदा बांधकामांवर कारवाई; महापालिकेच्या नोटिशीकडे दुर्लक्ष करून बांधकामे
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
anti-ragging rules, non-compliance of anti-ragging rules, National Medical Commission,
रॅगिंगविरोधी नियमांचे पालन न केल्यास कठोर कारवाई, राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाचा वैद्यकीय महाविद्यालयांना इशारा
Pune, sewage channels covering Pune, Pune Municipal Corporation, sewage pune, pune latest news,
पुणे : सांडपाणी वाहिन्यांची झाकणे समपातळीवर आणण्यासाठी महापालिकेने उचलले पाऊल !
Thane Water pipe connection, Thane arrears Water connection, Thane Water, Thane latest news, Thane marathi news,
ठाण्यात थकाबाकीदारांच्या १७८० नळजोडण्या खंडीत, ठाणे महापालिकेची कारवाई
Thane , government projects, dust, health,
सरकारी प्रकल्पांमुळेच धुळधाण, नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता
Lakshmi Road will be closed again within three months after Ganeshotsav
गणेशोत्सवानंतर तीन महिन्यातच ‘लक्ष्मी रस्ता’ पुन्हा राहणार बंद, काय आहे कारण?
pune municipality suffered financial loss due to state government decision
Pune Municipal Corporation : महापालिकेला का सोसवेना समाविष्ट गावांचा भार, काय आहे नक्की कारण?

विधानसभा निवडणुकीसाठी मतदान झाल्यानंतर पालिका प्रशासनाने आता आपल्या दैनंदिन कामावर लक्ष केंद्रित केले आहे. कर निर्धारण व संकलन खात्याच्या वतीने मुंबई शहर व उपनगरांमधील मालमत्ता कर वसुलीचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी महापालिका प्रशासनाने आता प्रयत्न सुरू केले आहेत. काही मोठ्या थकबाकीधारकांनी अद्याप कर भरणा केलेला नाही. त्यांना वेळोवेळी सूचना देऊनही योग्य प्रतिसाद मिळत नसल्याने महापालिकेच्या कर निर्धारण व संकलन खात्याने जप्तीची नोटीस बजावली आहे. दंड रकमेसह थकबाकी रकमेचा यात समावेश आहे.

आणखी वाचा-समाजमाध्यमावरील दागिन्यांच्या छायाचित्रावरून चोरीची उकल, घरकाम करणाऱ्या महिलेला अटक

मालमत्ताकर देयके मिळाल्यापासून ९० दिवसांच्या आत महानगरपालिकेकडे मालमत्ता कर जमा करणे आवश्यक आहे. या कालावधीत कर न भरल्यास महानगरपालिकेकडून टप्पानिहाय कारवाई करण्यात येते. तरीही मालमत्ता कर न भरल्यास ‘डिमांड लेटर’ पाठवण्यात येते. पुढच्या टप्प्यात मालमत्ता धारकास २१ दिवसांची अंतिम नोटीस दिली जाते. त्यानंतर थकबाकीदारांची मालमत्ता जप्ती, लिलाव आदी कारवाई केली जाते.

कर भरण्यासाठी २० नोव्हेंबर २०२४ रोजी पाठपुरावा केलेल्या ‘टॉप टेन’ मालमत्ताधारकांची यादी

१) दि रघुवंशी मिल्स् लिमिटेड (जी दक्षिण विभाग) – ११९ कोटी ५८ लाख ९८ हजार ६०० रुपये
२) मेसर्स ओंकार डेव्हलपर्स प्रा. लि. (जी दक्षिण विभाग) – १०४ कोटी ७८ लाख २५ हजार ७१३ रुपये
३) जे. कुमार इन्फ्रास्ट्रक्चर लि. (एच पूर्व विभाग) – ७१ कोटी ९८ लाख ०३ हजार ४४५ रूपये
४) जे. कुमार इन्फ्रास्ट्रक्चर लि. (एच पूर्व विभाग) – ६७ कोटी ५२ लाख १० हजार ५०२ रूपये
५) मेसर्स स्टर्लिंग इन्वेस्टमेंट कॉर्पोरेशन लि. (जी दक्षिण विभाग) – ५५ कोटी १० लाख ५६ हजार ९५६ रुपये
६) मेसर्स विमल असोसिएट्स (के पूर्व विभाग) – ४१ कोटी ७४ लाख ११ हजार २१५ रुपये
७) दि रघुवंशी मिल्स् लि. (जी दक्षिण विभाग) – ३८ कोटी ४८ लाख ६७ हजार ७९५ रुपये
८) प्रोव्हिनंस लॅण्ड प्रा. लि. (जी दक्षिण विभाग) – ३३ कोटी ६९ लाख ०७ हजार ७९ रुपये
९) समीर एन. भोजवानी (के पश्चिम विभाग) – ३३ कोटी ३९ लाख ४५ हजार ४० रूपये
१०) मेसर्स श्रीराम मिल्स् लि. (जी दक्षिण विभाग) – ३३ कोटी २३ लाख ५४ हजार ९६५ रूपये

आणखी वाचा-भाभा अणुशक्ती संशोधन केंद्र परिसरात ‘कॅमेरा ट्रॅपिंग’ संवर्धन आणि अभ्यासासाठी विशेष उपक्रम

ऑनलाईन करभरण्यासाठी…

कर भरणा करण्याकरीता ऑनलाईल सुविधा उपलब्ध आहे. ऑनलाईन कर भरणा करण्यासाठी करदात्यांनी महापालिकेच्या https://www.mcgm.gov.in या संकेतस्थळावरील माहितीचा वापर करावा, असे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे.

Story img Loader