मुंबई : कोणत्याही क्षणी विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता जाही होण्याच्या धसक्याने महापालिकेच्या विविध विकासकामांचे घाईघाईत भूमीपूजन करण्यात आले. त्याच वेळी पालिकेच्या के उत्तर विभाग कार्यालयाचेही उद्घाटन करण्यात आले. माजी मात्र निवडणुकीचा निकाल लागून सत्तास्थापनही झाले. मात्र अद्याप हे कार्यालय प्रत्यक्षात सुरू झालेले नाही.

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महापालिकेच्या विविध विकासकामांचे उद्घाटन व लोकार्पण करण्यात आले. त्याचदरम्यान, अंधेरी, जोगेश्वरी पूर्वचा भाग असलेल्या महापालिकेच्या के उत्तर विभाग कार्यालयाचेही उद्घाटन घाईघाईने करण्यात आले. के पूर्व विभाग कार्यालयाचे विभाजन गेल्या कित्येक वर्षांपासून रखडले होते. मात्र विधानसभा निवडणुकीपूर्वीचा मुहूर्त साधत या कार्यालयाचे उद््घाटन करण्यात आले. या विभाग कार्यालयाचे उद््घाटन शुक्रवारी ११ ऑक्टोबर रोजी करण्यात आले. मात्र निवडणुकीची आचारसंहिता संपुष्टात आली. मतमोजणीअंती निकाल जाहीर झाला. सरकारही स्थापन झाले. तरी हे कार्यालय पूर्णतः सुरू झालेले नाही. प्रशासकीय विभाग कार्यालयाच्या माध्यमातून पुरवण्यात येणाऱ्या १७ प्रकारच्या नागरी सेवा-सुविधा या कार्यालयात अद्यापही सुरू झालेल्या नाहीत. सध्या या कार्यालयात केवळ नागरी सुविधा केंद्र सुरू आहे, अशी माहिती येथील नागरिकांनी दिली. पालिका अधिकाऱ्यांनीही या वृत्ताला दुजोरा दिला. निवडणुकीमुळे पालिकेचे कर्मचारी निवडणूक कर्तव्यावर गेल्यामुळे हे कार्यालय सुरू करण्यास उशीर झाल्याची माहिती पालिका अधिकाऱ्यांनी दिली.

Image of Manmohan Singh's sister
Manmohan Singh Death : मनमोहन सिंग यांच्या बहिणीची व्यथा, आजारपणामुळे घेता येणार नाही भावाच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Manmohan Singh launched the Technology Mission on Citrus for orange growers in Vidarbha
डॉ.मनमोहन सिंग, नागपूरची संत्री आणि ‘मिशन सिट्रस’
Cyber ​​criminals cheated the people of Nagpur of Rs 141 crore
सायबर गुन्हेगारांनी नागपूरकरांना घातला १४१ कोटींचा गंडा, १३ हजारांवर तक्रारी
Ritika Malu Hit and Run Case CID officers help accused
नागपूर : सीआयडी अधिकाऱ्यांची आरोपींना मदत; रितिका मालू ‘हिट अँड रन प्रकरण’
Chief Minister Fadnavis instructs to provide various services without delay District Good Governance Index Report released
विविध सेवा विनाविलंब उपलब्ध करा; मुख्यमंत्री फडणवीस यांची सूचना; जिल्हा सुशासन निर्देशांक अहवालाचे प्रकाशन
Pune Municipal Corporation construction department issued notices to 125 construction projects in the city and stopped work Pune print news
पुणे: बांधकाम बंद ठेवण्याच्या नोटिशींचा ‘फार्स’ ?
The work on six water tanks of Pune Municipal Corporation is still not complete Pune print news
सहा टाक्या, तरी पाणी मिळेना! पुण्यातील प्रकार

हेही वाचा >>>शपथ घेतली, चिंता मिटली; अजित पवारांना दिलासा, मालमत्तेवर टाच आणण्याचा आदेश रद्द

मध्यरात्री दोन वाजता उद्घाटन

या विभागातील शिवसेनेचे (शिंदे) खासदार रवींद्र वायकर यांच्या पाठपुराव्यामुळे झालेल्या कामांचे उद्घाटन व भूमीपजून तातडीने आणि घाईघाईत करण्यात आले. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मध्यरात्री २ वाजता या कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले होते. या उद्घाटनासाठी पालिकेचे कर्मचारी अधिकारी, परिसरातील नागरिक, वायकर यांचे कार्यकर्ते ७ वाजल्यापासून हजर होते. उद्घाटनांचे सर्व कार्यक्रम करीत मुख्यमंत्र्यांना जोगेश्वरीत पोहोचण्यासाठी मध्यरात्रीचे २ वाजले. मात्र इतक्या तातडीने मध्यरात्री उद्घाटन केले तरी प्रत्यक्षात हे कार्यालय अद्यापही सुरू झालेले नाही.

के उत्तर विभाग कार्यालयाअंतर्गत एकूण आठ प्रभागांचा समावेश आहे. एकूण ८.५० चौरस किलोमीटर क्षेत्रफळाच्या क्षेत्रात हा विभाग विस्तारलेला आहे. अंदाजे चार लाखांहून अधिक लोकसंख्येचा समावेश या विभागामध्ये आहे. शाम नगर तलाव, मेघवाडी, सर्वोदय नगर, शेर ए पंजाब वसाहत, जलाशय, जोगेश्वरी गुंफा, महाकाली गुंफा, जोगेश्वरी रेल्वे स्थानक पूर्व परिसराचा समावेश या प्रशासकीय विभागामध्ये आहे. या दहा मजली इमारतीमध्ये तळ मजल्यावर नागरी सुविधा केंद्र आहे. तसेच तिसऱ्या, चौथ्या आणि पाचवा मजल्यावर के उत्तर विभागाचे कार्यालय असणार आहे.

के उत्तर विभाग

क्षेत्रफळ – ८.५० चौरस किलोमीटर

लोकसंख्या – ४.२५ लाख

प्रभाग संख्या – ८

Story img Loader