मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या विधी खात्यात सहाय्यक कायदा अधिकारी व सहाय्यक कायदा अधिकारी (श्रेणी २) ही पदे सरळसेवा पद्धतीने भरण्यात येणार आहेत.  एकूण ५३ पदांसाठी मंगळवार, २५ जुलैपासून अर्ज भरता येणार आहेत. मुंबई महानगरपालिकेच्या विधी खात्यात सहाय्यक कायदा अधिकारी पदासाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. यात सहाय्यक कायदा अधिकारी पदासाठी ३४ जागा  आहेत. तर सहाय्यक कायदा अधिकारी श्रेणी २ साठी १९ रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

महापालिकेने बार कौन्सिल ऑफ इंडिया यांच्या विरुद्ध सर्वोच्च न्यायालयात महापालिकेच्या वकिलांना कामकाज पाहण्यासाठी परवानगी मिळण्याबाबत दाखल केलेल्या विशेष याचिकेच्या अंतिम निर्णयासापेक्ष या पदांची नियुक्ती तात्पुरत्या स्वरूपाची राहील. जर सर्वोच्च न्यायालयाचा आदेश महापालिकेच्या विरुद्ध लागल्यास तो निवड झालेल्या उमेदवारांवर बंधनकारक राहील व त्यांची सेवा कोणतेही कारण न देता समाप्त करण्यात येईल, असेही महापालिकेने स्पष्ट केले आहे.

येथे अर्ज करा : https://portal.mcgm.gov.in/irj/portal/anonymous/qlm मुंबई महापालिकेच्या या वेबसाईटवर अर्ज करा.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbai municipal corporation recruitment post of assistant law officer application process starts from today mumbai print news ysh
Show comments