मुंबई: सायन प्रतीक्षानगर येथे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त लावलेला फलक पालिकेच्या पथकाने काढल्यामुळे या परिसरात तणाव निर्माण झाला आहे. तेथे लावलेले अन्य पक्षांचे फलक तसेच ठेवून केवळ ठाकरे गटाचा फलक काढल्यामुळे शिवसैनिक जमले आहेत.

येत्या २३ जानेवारीला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती आहे. त्यानिमित्ताने शिवसेनेच्या दोन्ही गटांच्यावतीने मुंबईत विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. शिवसेना (ठाकरे) पक्षाच्यावतीने सायन प्रतीक्षानगर भागात अशाच एका कार्यक्रमाचा फलक लावण्यात आला होता. रात्री साडेआठच्या सुमारास पालिकेच्या पथकाने हा फलक काढला.  फलक काढताना तो फाटला. या घटनेमुळे शिवसैनिक प्रचंड आक्रमक झाले आहेत. शिवसेनेची शाखा क्रमांक १७३ तेथे जवळच असून शाखेच्या समोरच फलक फाडल्यामुळे सगळे शिवसैनिक रस्त्यावर जमले आहेत.

Nagpur strength of uddhav Thackeray shivsena
शिवसेना ठाकरे गटाचे नागपुरात स्वबळ किती? निष्ठावानांकडे कायम दुर्लक्ष केल्याने पक्षाची घसरण
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Anand Dighe and Balasaheb Thackeray
Private:
Uddhav thackeray and Prakash Ambedkar
ठाकरेंच्या शिवसेनेने स्वबळाचा नारा दिल्यानंतर प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप; म्हणाले, “आदित्य ठाकरेंच्या…”
Uddhav Thackeray statement on Balasaheb work Mumbai news
श्रेयवादापेक्षा बाळासाहेबांचे कार्य पोहोचवणे महत्त्वाचे; स्मारकाच्या पाहणीनंतर उद्धव ठाकरे यांचे प्रतिपादन
What Uddhav Thackeray Said?
Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंचं वक्तव्य, “ज्यांनी बाळासाहेब ठाकरेंचे विचार सोडले नाहीत ते सगळेजण…”
Pune city Shiv Sena uddhav thackeray eknath shinde
शिवसेनेला पुणेकरांचा ‘जय महाराष्ट्र’?
former Shiv Sena ubt corporator said real Shiv Sena belongs to Uddhav Thackeray
शिवसेना कोणाची ? भाजपमध्ये प्रवेश केलेल्या नगरसेवकांची स्पष्ट भूमिका म्हणाले…!

हेही वाचा >>>एमएमआरडीएच्या तिसऱ्या मुंबईच्या भूसंपादनाला विरोध, शेतकऱ्यांच्या गावोगावीच्या जनजागृतीला सुरुवात

माटुंगा एफ/उत्तर अधिकारी वर्गावर कारवाई करा अशी मागणी करत शिवसैनिकांनी यावेळी रस्त्यावर ठाण मांडला आहे. या परिसरात अन्य पक्षांचेही फलक असताना त्याला हात न लावता केवळ आमच्याच पक्षाचा फलक फाडला, म्हणजे पालिकेचे अधिकारी कोणाच्या सांगण्यावरून कारवाई करतात का असा सवाल विभागप्रमुख गजानन पाटील यांनी केला आहे. या परिसरात तणाव निर्माण झाला असून पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.

Story img Loader