मुंबई : मुंबई महानगरपालिकेने शिवडीमधील राम टेकडी मार्ग आणि डब्बेवाला चाळ, परळमधील हिमालया चाळ आणि वडाळा येथील बरकत अली नगर येथे सामुदायिक प्रसाधनगृह बांधण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रसाधनगृहांच्या पुनर्बांधणीचे भूमिपूजन शालेय शिक्षण मंत्री तथा मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते गुरुवार पार पडले.

मुंबईमधील झोपडपट्टी बहुल विभागांमध्ये लॉट १२ या प्रकल्पांतर्गत वस्ती स्वच्छता कार्यक्रमाचा भाग म्हणून सामुदायिक प्रसाधनगृहांचे पुर्नबांधणी करण्यात येत आहे. मुंबई शहर विभागात एकूण ८६ ठिकाणी सामुदायिक प्रसाधनगृहांची पुर्नबांधणी करण्यात येणार आहे.

Aditi Tatkare, Ladki Bahin Yojana, Ladki Bahin Yojana Fund, Fund Issue, Aditi Tatkare Pune,
लाडक्या बहीण योजनेसाठी इतर कोणत्याही विभागाचा निधी वळविण्यात आलेला नाही – मंत्री आदिती तटकरे
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
Buldhana ST, ST benefits , maharashtra Assembly elections ,
बुलढाणा : निवडणुकीमुळे एसटी महामंडळाचेही चांगभलं, तब्बल पाऊण कोटीचा…
Loksatta Chatura How to plan a New Year 2024 party at home
चतुरा: घरीच करा न्यू ईयर पार्टीची धम्माल
students failed in 5th and 8th standard in maharashtra
राज्यात पाचवी, आठवीचे किती विद्यार्थी अनुत्तीर्ण?
Eleven policemen on duty at the Welfare Court suspended kalyan news
कल्याण न्यायालयातील कर्तव्यावरील अकरा पोलीस निलंबित
amit shah inaugurates 10000 newly formed multipurpose pacs
प्रत्येक गावात बहुउद्देशीय संस्थाच केंद्रीय सहकार मंत्र्यांची घोषणा, ३२ प्रकारच्या व्यवसायांची मुभा
Public Works Minister Shivendra Raje, Satara Shivendra Raje,
साताऱ्यातील आम्ही चारही मंत्री एकत्रितपणे जिल्ह्याचा विकास करू, सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रराजेंचा विश्वास

हेही वाचा : तुनिषा आत्महत्या प्रकरण : अभिनेता शिझान खानला दिलासा नाहीच; गुन्हा रद्द करण्याची मागणी उच्च न्यायालयाने फेटाळली

परळ, शिवडी आणि वडाळा येथील सामुदायिक प्रसाधनगृह बांधण्याचे काम महानगरपालिकेने हाती घेतले आहे. या कामांचे भूमिपूजन मुंबई शहर जिल्हा पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्त करण्यात आले. आमदार कालिदास कोळंबकर, आमदार आर. तमील सेल्वन, उपआयुक्त (घनकचरा व्यवस्थापन) चंदा जाधव, उपआयुक्त (परिमंडळ २) रमाकांत बिरादार, सहायक आयुक्त चक्रपाणी अल्ले आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

हेही वाचा : मुंबई : मराठी तरुणाने बदलायला लावले रेल्वेच्या ‘एक्स’ खात्याचे नाव

राम टेकडी मार्ग येथील सामुदायिक प्रसाधनगृहांमध्ये एकूण १९ शौचकुपे, डब्बेवाला चाळीसाठी एकूण २२ शौचकुपे, हिमालया चाळसाठी एकूण ३७ शौचकुपे आणि बरकत अली नगर येथे एकूण ५१ शौचकुपे बांधण्यात येणार आहेत.

Story img Loader