मुंबई : कर्करोग रुग्णांच्या उपचारासाठी वांद्रे येथे स्वतंत्र रुग्णालय बांधण्याचे प्रस्तावित असून त्यासाठी आता मुंबई महानगरपालिकेने पावले उचलली आहेत. हे १६५ खाटांचे रुग्णालय बांधण्यासाठी कंत्राटदाराची निवड करण्यात आली असून तीन वर्षांत रुग्णालय सुरू करण्याचे नियोजन आहे. यासाठी २१३ काेटी रुपये खर्च येणार आहे.

परळ आणि खारघर येथील टाटा रुग्णालयात देशातून मोठ्या प्रमाणात रुग्ण उपचारासाठी येत असतात. मुंबई महानगरपालिकेने नायर रुग्णालयात कर्करोगावरील उपचार सुरू केले आहेत. परंतु वाढत्या रुग्णसंख्येमुळे ही व्यवस्था फारच अपुरी ठरत आहे. कर्करोगाच्या रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता वांद्रे येथील भाभा रुग्णालयाच्या जवळील आर. के. पेटकर मार्गावर मुंबई महानगरपालिकेसाठी आरक्षित असलेल्या २ हजार ५२५ वर्ग मीटर भूखंडावर स्वतंत्र कर्करोग रुग्णालय सुरू करण्याचा निर्णय तत्कालिन मुंबई महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी घेतला होता. महानगरपालिकेच्या वास्तुविशारदांनी रुग्णालय उभारण्यासंदर्भातील आराखडा तयार केल्यानंतर बांधकामासाठी निविदा काढण्यात आल्या होत्या. या निविदा प्रक्रियेत कंत्राटदार निश्चित करण्यात आला आहे.

maharashtra vidhan sabha elections 2024, Rajura,
शेतकऱ्यांच्या प्रश्नावर थेट आंदोलन न करणाऱ्या ॲड. चटप यांना मतदार स्वीकारणार का?
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Greater Noida
Greater Noida : डोळ्यावर शस्त्रक्रिया न करताच हॉस्पिटलने ४५ हजार उकळले; दुसऱ्या डॉक्टरनी तपासल्यानंतर झालं उघड
Nurses without pay for four months Mumbai print news
परिचारिका चार महिने वेतनाविना
indian rupee falls to all time low against us dollar
अग्रलेख : काका… मला वाचवा!
public banks profit increase by 26 percent in first half fy 25
सरकारी बँकांच्या नफ्यात सहामाहीत २६ टक्के वाढ
young adults prefer to invest in stocks directly rather than mfs report by fin one
म्युच्युअल फंडापेक्षा तरुणाईचा कल थेट समभागांत गुंतवणुकीकडे; ९३ टक्के कमावत्या तरुणांत मासिक बचतीची सवय

हेही वाचा >>> वरळी अपघातातील मोटर वाहन कायद्याअंतर्गत कलमांमध्ये वाढ

रुग्णालय कसे असेल?

कर्करोग रुग्णालयाची इमारत ही दोन तळघरांसह १० मजली असेल. जवळपास १३ हजार वर्ग मीटर इतके बांधकाम करण्यात येणार आहे. इमारतीच्या एक ते आठ मजल्यांवर कर्करोगासंदर्भातील उपचारांच्या सुविधा असतील. तसेच नवव्या आणि दहाव्या मजल्यावर अधिकारी, कर्मचारी आणि डॉक्टरांच्या राहण्याची व्यवस्था असेल.

हेही वाचा >>> बँकॉकहून आणलेल्या गांजासह प्रवाशाला अटक; दोन दिवसांत साडेचार कोटी रुपयांचा गांजा जप्त

सुविधा काय असतील?

रुग्णालयामध्ये केमोथेरपी, रेडिओथेरपी, अतिदक्षता विभाग, अद्ययावत कर्करोग उपचार सुविधा असणार आहेत. यामध्ये रेडियोथेरेपीसाठी दोन स्वतंत्र कक्ष, १२ बाह्यरुग्ण कक्ष, विविध प्रकारच्या पाच प्रयोगशाळा, मॅमोग्राफी आणि पीईटी-सीटी युनिट्स, सभागृह, रक्तपेढी, विलगीकरण कक्ष, रुग्णांच्या कुटुंबीयांसाठी वसतिगृहाची सुविधाही उपलब्ध होणार आहे.