मुंबई : मुंबई महानगरपालिकेने पुढील शैक्षणिक वर्षापासून प्रत्येक विभागात किमान एक सीबीएसई शाळा सुरू करण्याचा संकल्प सोडला असून महानगरपालिकेच्या सिक्षण विभागाने त्यादृष्टीने नियोजन करण्यास सुरुवात केली आहे. सध्या मुंबईत महानगरपालिकेच्या १४ सीबीएसई शाळा सुरू आहेत. त्यापैकी तीन सीबीएसई शाळा चालू शैक्षणिक वर्षात सुरू करण्यात आल्या आहेत. पालकांची वाढती मागणी लक्षात घेऊन भविष्यात या शाळांची संख्या वाढविण्यात येणार आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
मुंबईमधील जोगेश्वरी (पूर्व) येथील पूनम नगर परिसरात २०२० साली मुंबई पब्लिक स्कुलमध्ये पहिली सीबीएसई शाळा सुरू करण्यात आली. या शाळेला मिळालेला प्रतिसाद लक्षात घेऊन महानगरपालिकेने आर्थिकदृट्या दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांसाठी मुंबईत अन्य ठिकाणीही बीएससीच्या शाळा सुरू करण्याचे ठरवले होते. महानगरपालिकेने २०२१ मध्ये आणखी १० ठिकाणी सीबीएसई शाळा सुरू केल्या. तसेच आयसीएसई, आयबी आणि केंब्रीज आयजीसीएसई या बोर्डाची प्रत्येकी एक शाळा सुरू करण्यात आली. या शाळांनाही प्रतिसाद वाढल्यामुळे गेल्यावर्षी महानगरपालिकेने सीबीएसई शाळेतील छोटा शिशू व बालवाडी वर्गाची एकेक तुकडी वाढवली होती. त्यामुळे ९६० जागा वाढल्या होत्या.
सातत्याने सीबीएसई शाळांची मागणी वाढत असून मुंबईत आणखी सीबीएसई शाळा सुरू करण्याचा शिक्षण विभागाचा प्रयत्न असल्याची माहिती पालिका अधिकाऱ्यांनी दिली. महानगरपालिकेच्या शाळांमध्ये केंद्रीय व आंतराष्ट्रीय मंडळाच्या शाळा सुरू झाल्यापासून विद्यार्थ्यांचा ओघ वाढला आहे. अन्य मंडळांच्या खाजगी शाळांचा खर्च परवडत नसल्यामुळे सर्वसामान्य व गरीब कुटुंबातील मुलांना त्या शाळांमध्ये जाता येत नाही. त्यामुळे महानगरपालिकेच्या सीबीएसई, आयसीएसई आणि आंतरराष्ट्रीय मंडळाच्या शाळांना पालकांकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे.
ऑनलाईन पद्धतीने अर्ज जारी करून प्रवेशासाठी सोडत काढण्यात येते. केंद्रीय व आंतरराष्ट्रीय शाळा सुरू झाली असली तरी त्यांच्या मान्यतेची प्रक्रिया अद्याप सुरू असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. सीबीएसई, आयसीएसई व केंब्रीज मंडळाच्या शाळांमधील प्रत्येक वर्गाची पटसंख्या ४० विद्यार्थी, तर आयबी मंडळाच्या शाळेमधील प्रत्येक वर्गाची पटसंख्या ३० विद्यार्थी इतकी आहे. महापौरांच्या स्वेच्छाधिकाराच्या १० टक्के जागा राखीव असतात तर महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांसाठी पाच टक्के जागा राखीव ठेवण्यात येतात. उर्वरित जागांवर ऑनलाईन पद्धतीने प्रवेश प्रक्रिया राबवली जाते.
सध्या या शाळांमध्ये सीबीएसईची शाळा
भवानी शंकर रोड मनपा शाळा, काणेनगर मनपा शाळा, प्रतीक्षानगर मनपा शाळा, दिंडोशी मनपा शाळा, जनकल्याण मनपा शाळा (मालाड), तुंगा व्हिलेज शाळा (कुर्ला), राजावाडी मनपा शाळा (विद्याविहार), अझीझबाग मनपा शाळा (चेंबूर), हरियाली व्हिलेज मनपा शाळा (विक्रोळी पूर्व), मिठागर शाळा (मुलुंड पूर्व), मुंबई पब्लिक स्कूल, आणिक गाव, जिजामाता नगर, (चेंबूर पश्चिम), मुंबई पब्लिक स्कूल, एम. जी क्रॉस रोड, साईनगर (कांदिवली पश्चिम), मुबई पब्लिक स्कूल, आशिष तलाव, वडवली, आरसीएफ, (चेंबूर).