मुंबई : मुंबई महापालिकेत बऱ्याच काळानंतर मोठ्या प्रमाणावर पालिका अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. सात उपायुक्त तसेच एकूण बारा सहाय्यक आयुक्त यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.पालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्या आदेशानुसार या बदल्या करण्यात आल्या आहेत. काही सहाय्यक आयुक्तांना उपायुक्त पदी बढती मिळाली आहे. तर लोकसेवा आयोगाकडून उपलब्ध झालेल्या आणखी चार उमेदवारांचे प्रशिक्षण पूर्ण झाले असून ते सहाय्यक आयुक्त म्हणून रुजू होणार आहेत. त्यामुळे पालिका प्रशासनात एकचवेळी मोठ्या प्रमाणावर खांदेपालट करण्यात आला आहे. या निर्णयामुळे अनेक वर्ष एकाच पदावर, एकाच विभागात असलेल्या अधिकाऱ्यांना आपले विभाग सोडावे लागणार आहेत.
बृहन्मुंबई महानगरपालिकेतील सात उपायुक्त तसेच एकूण बारा सहाय्यक आयुक्त यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. शरद उघडे, अजित आंबी, पांडुरंग गोसावी, विश्वास मोटे या चार सहाय्यक आयुक्तांना उपायुक्तपदी बढती मिळाली आहे. तर लोकसेवा आयोगाकडून आलेले दिनेश पल्लेवाड, योगिता कोल्हे, उज्वल इंगोले, अरूण क्षीरसागर यांनाही सहाय्यक आयुक्त म्हणून विभागामध्ये पदभार देण्यात आला आहे.सार्वजनिक आरोग्य विभाग या महत्वाच्या विभागाची जबाबदारी शरद उघडे यांच्याकडे दिली आहे. तर आरोग्य विभागाचे उपायुक्त संजय कुऱ्हाडे यांना परिमंडळ ७ ची जबाबदारी दिली आहे.
कोणाच्या कुठे बदल्या…
१) विश्वास शंकरवार, सहआयुक्त (परिमंडळ ४) – सहआयुक्त (कर निर्धारण व संकलन) ( संपर्क अधिकारी, मागासवर्ग कक्ष)
२) डॉ. भाग्यश्री कापसे, उपायुक्त (परिमंडळ ७) – उपायुक्त (परिमंडळ ४)
३) संजय कुऱ्हाडे, उपायुक्त (सार्वजनिक आरोग्य) ( प्रकल्प संचालक, मुंबई जिल्हा एडस् नियंत्रण संस्था) – उपायुक्त (परिमंडळ ७)
यांना बढती
१) शरद उघडे, सहायक आयुक्त (डी विभाग) – उपायुक्त (सार्वजनिक आरोग्य) ( माहिती तंत्रज्ञान विभाग) ( प्रकल्प संचालक, मुंबई जिल्हा एडस् नियंत्रण संस्था)
२) अजित आंबी, सहायक आयुक्त (जी उत्तर विभाग) – उपायुक्त (उद्याने)
३) पांडुरंग गोसावी, प्रमुख लेखापाल (पाणीपुरवठा व मलनिसारण) – उपायुक्त (मध्यवर्ती खरेदी खाते)
४) विश्वास मोटे, सहायक आयुक्त (एम पश्चिम विभाग) – उपायुक्त (परिमंडळ ३)
सहाय्यक आयुक्तांच्या बदल्या
१) विनायक विसपुते, सहायक आयुक्त (एच पश्चिम विभाग) – सहायक आयुक्त (जी उत्तर विभाग) ( सहायक आयुक्त, अतिक्रमण निर्मूलन, पूर्व व पश्चिम उपनगरे)
२) मनीष वळंजू, सहायक आयुक्त (के पूर्व विभाग) – सहायक आयुक्त (डी विभाग) ( सहायक आयुक्त, बाजार विभाग – अतिरिक्त कार्यभार)
३) अलका ससाणे, सहायक आयुक्त (एम पूर्व विभाग) – सहायक आयुक्त (एस विभाग)
४) नितीन शुक्ला, सहायक आयुक्त (एफ उत्तर विभाग) ➡ सहायक आयुक्त (बी विभाग)
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून आलेले सहायक आयुक्त
१) दिनेश पल्लेवाड – सहायक आयुक्त, एच पश्चिम विभाग
२) योगिता कोल्हे – सहायक आयुक्त, टी विभाग
३) उज्वल इंगोले – सहायक आयुक्त, एम पूर्व विभाग
४) अरूण क्षीरसागर – सहायक आयुक्त, एफ उत्तर विभाग