मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या महालक्ष्मी आणि गोराई येथील कचरा हस्तांतरण केंद्राला आता अत्याधुनिक तंत्रज्ञानाची जोड देण्यात येणार आहे. भविष्यात कचऱ्याचे वर्गिकरण यांत्रिक पद्धतीने करण्यात येणार असून त्यामुळे कचराभूमीवर जाणाऱ्या कचऱ्याचे प्रमाण कमी होईल, असा दावा करण्यात आला आहे. त्याचबरोबर उघड्यावर असलेली ही कचरा हस्तांतरण केंद्र आता बंदिस्त करण्यात येणार आहेत. त्यामुळे आजूबाजूच्या इमारतींमधील रहिवाशांची कचऱ्याच्या दुर्गंधीपासून सुटका होऊ शकेल, असाही दावा करण्यात आला आहे.

मुंबईतील विविध विभागांतून जमा केलेला कचरा कचराभूमीवर नेण्यापूर्वी कचरा हस्तांतरण केंद्रांवर आणला जातो. मुंबईत महालक्ष्मी, कुर्ला, गोराई, वर्सोवा येथे कचरा हस्तांतरण केंद्रे आहेत. महानगरपालिकेने सुका आणि ओला कचरा वेगवेगळा करण्याचे आवाहन केले आहे. मात्र तरीही अनेक वेळा वर्गिकरण न करताच एकत्रीत कचरा कचराभूमीवर जातो. ही बाब लक्षात घेऊन या कचऱ्याचे पालिकेच्या कचरा हस्तांतरण केंद्रांवर वर्गिकरण केले जाते. ही वर्गिकरणाची प्रक्रिया अधिक सुलभ व यांत्रिक पद्धतीने करण्यासाठी कचरा हस्तांतरण केंद्राचे आधुनिकीकरण केले जाणार आहे. महालक्ष्मी व गोराई येथील कचरा हस्तांतरण केंद्राचे आधी आधुनिकीकरण करण्यात येणार असून त्याकरीता पालिकेच्या घनकचरा विभागाने निविदा मागवल्या आहेत.

Buldhana ST, ST benefits , maharashtra Assembly elections ,
बुलढाणा : निवडणुकीमुळे एसटी महामंडळाचेही चांगभलं, तब्बल पाऊण कोटीचा…
Pune city Shiv Sena uddhav thackeray eknath shinde
शिवसेनेला पुणेकरांचा ‘जय महाराष्ट्र’?
Thane Anti Corruption Bureau arrested senior clerk for demanding two percent to clear dues
लाचेप्रकरणी सार्वजनिक बांधकाम विभागातील वरिष्ठ लिपीक अटकेत
The authority is taking possession of houses distributed to 21 people with fake documents
घर असतानाही पात्र झालेल्या २१ झोपडीवासीयांविरुद्ध कारवाई ! सर्व घरे ताब्यात घेणार!
raining in Akola district during the winter season
अकोला: ऐन हिवाळ्यात पावसाचा तडाखा; वातावरणातील बदलाने…
Chief Minister Fadnavis instructs to provide various services without delay District Good Governance Index Report released
विविध सेवा विनाविलंब उपलब्ध करा; मुख्यमंत्री फडणवीस यांची सूचना; जिल्हा सुशासन निर्देशांक अहवालाचे प्रकाशन
Tire killer is going to be tested in three important areas of Thane railway station area
स्थानक परिसरात लवकरच ‘टायर किलर’
Mechanism to assess the effects of earthquakes in 30 dams in Maharashtra
राज्यातील ३० धरणांमध्ये भूकंपाचे परिणाम जोखण्यासाठी यंत्रणा

हेही वाचा >>>मुंबई : सांताक्रुझमध्ये हॉटेलला आग

महालक्ष्मी येथे दररोज ६२५ मेट्रिक टन, तर गोराई येथे ३५० मेट्रिक टन कचरा जमा होतो. या कचऱ्यावर प्रक्रिया आणि केंद्रांचे अद्ययावतीकरण करण्यासाठी आराखडा तयार करण्यात येणार आहे. आराखडा तयार करण्यासाठी पालिकेने निविदा मागवल्या आहेत. आता महालक्ष्मी आणि गोराई कचरा स्थानांतरण केंद्रावर अद्ययावत पद्धतीने कचऱ्यावर प्रक्रिया केली जाणार आहे. महालक्ष्मी, गोराई या केंद्रावर कचऱ्याचे वर्गीकरण, प्रक्रिया, बायोगॅस आणि खतनिर्मिती करण्यात येणार आहे.

आजूबाजूच्या इमारतींचा त्रास वाचणार

ही कचरा हस्तांतरण केंद्रे सध्या उघड्यावरच असून त्यामुळे आजूबाजूच्या परिसरात दुर्गंधी पसरत आहे. महालक्ष्मी परिसरात कचरा हस्तांतरण केंद्राच्या बाजूला उंच इमारती आहेत. नागरिकांना घरातूनच कचऱ्याचे ढीग दिसतात, तसेच प्रचंड दुर्गंधी येते, अशी तक्रार वारंवार या इमारतींमधील रहिवाशांकडून करण्यात येत आहे. त्यामुळे हे कचरा हस्तांतरण केंद्र आता बंदिस्त करण्यात येणार आहे.

Story img Loader