लोकसत्ता प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबई : महानगरपालिकेच्या रुग्णालयांमधील कचरापेटीमुळे आसपास पसरणारी दुर्गंधी, भटक्या जनावरांचा वावर यामुळे रुग्णांना होणारा त्रास लक्षात घेता कचऱ्याचे नियोजन करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने रुग्णालयांमध्ये भूमिगत कचरापेटी बसावण्याचा निर्णय घेतला आहे. सुरुवातील शहरातील १५ रुग्णालयांमध्ये हा प्रयोग राबविण्यात येणार असून, तो यशस्वी झाल्यानंतर शहरातील सर्व महानगरपालिकांच्या रुग्णालयात त्याचा विस्तार करण्यात येणार आहे.

मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयांमधील स्वच्छता हा नेहमीच वादाचा विषय ठरत असतो. अतिरिक्त आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांनी रुग्णालयातील स्वच्छतेवर भर दिला आहे. सध्या रुग्णालयामध्ये तीन सत्रांत साफसफाई करण्यात येते. हा कचरा रुग्णालयाच्या परिसरातील कचरापेटीत टाकण्यात येतो. त्या कचरापेटीच्या आसपासच्या परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरलेली असते. तसेच तेथे कचरापेटीजवळ श्वान, उंदीर यांचा वावर वाढतो. त्याचा त्रास रुग्णांसह त्यांच्या नातेवाईकांनाही होत असतो. रुग्णालयात पसरणारी दुर्गंधी व भटक्या प्राण्यांमुळे होणारा त्रास लक्षात घेता मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयांत भूमिगत कचरापेटी बसावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

आणखी वाचा-मुंबई- पुणे द्रुतगती मार्ग आज दोन तास बंद

प्रभाग अ मध्ये प्रयोग

प्रभाग अ मध्ये एक वर्षापूर्वी हा प्रयोग करण्यात आला होता. तेथे हा प्रयोग यशस्वी झाला होत. त्यामुळे मुंबई शहर व उपनगरामध्ये भूमिगत कचरापेटी बसवण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयांमध्येही भूमिगत कचरापेटी बसवण्यात येणार असल्याचे महानगरपालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbai municipal corporation will install underground garbage bins in the hospital mumbai print news mrj
Show comments