मुंबई पालिकेच्या कार्यकारी अभियंताला लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयाने अटक केली. सतीश पोवार असे त्या लाचखोर अभियंताचे नाव आहे. अंधेरी पूर्वेतील एका खासगी कंपनीतील पत्र्याची शेड तोडू नये यासाठी ५० लाखांची लाच मागितली होती. ही लाच स्विकारताना लाचलुचपत विभागाने त्यांना रंगेहात पकडले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा- कारागृहातील दयनीय स्थिती दाखवण्यासाठी आरोपीची अजब क्लृप्ती; मेलेल्या डासांनी भरलेली बाटली न्यायालयात आणली

मुंबईत भ्रष्ट विभाग म्हणून बऱ्यापैकी चर्चेत असलेल्या के पूर्व विभागात सदर कंपनीचे कार्यालय आहे. या कंपनीच्या आवारात पत्र्याची शेड बांधण्यात आली होती. ही शेड अनधिकृत असल्याबाबत पालिकेने नोटिस बजावली. या नोटिशीचे उत्तरही देण्यात आले. परंतु ही शेड पाडण्यासाठी पालिकेचे पथक आले. तेव्हा तक्रारदाराने कार्यकारी अभियंता पोवार यांना संपर्क साधला असता त्यांनी कार्यालयात भेटायला बोलाविले. शेड न तोडण्यासाठी ५० लाखांची लाच मागितली. तक्रादाराने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदविली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून पोवार यांना ५० लाखांची लाच घेताना रंगेहाथ अटक केली.