मुंबई: मुंबई ते नागपूर व्हाया नाशिक बुलेट ट्रेन प्रकल्पाला गती देण्यात येत आहे. या मार्गिकेचा सविस्तर प्रकल्प अहवाल पूर्ण झाला असून तो मंजुरीसाठी रेल्वे बोर्डाकडे पाठवण्यात आल्याची माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या कामाला गुजरातमध्ये वेग दिला जात असून सुरत ते बिलिमोरा या मार्गावर पहिली बुलेट ट्रेन २०२६ पासून चालवण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. या प्रकल्पाबरोबरच देशभरात आणखी सात नव्या मार्गावर बुलेट ट्रेन चालवण्याचे नियोजन केले जात आहे. यामध्ये मुंबई ते नागपूर व्हाया नाशिक (७४० किमी), दिल्ली ते अहमदाबाद, दिल्ली ते अमृतसर, मुंबई ते हैद्राबाद, चैन्नई ते म्हैसूर, वाराणसी ते हावडा, दिल्ली ते वाराणीसी या मार्गाचा समावेश आहे. या प्रकल्पांना अद्याप मंजुरी नाही. यातील राज्यातील मुंबई ते नागपूर बुलेट ट्रेन प्रकल्पाला गती देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार नॅशनल हायस्पीड रेल्वे कॉर्पोरेशनने काही सर्वेक्षणाची कामे हाती घेताना खासगी सल्लागार कंपनीचीही नियुक्ती केली. यात सविस्तर प्रकल्प अहवालाचे काम गेल्या नऊ महिन्यांपासून सुरु होते. हे काम पूर्ण झाले असून सविस्तर प्रकल्प अहवाल २८ फेब्रुवारीला रेल्वे बोर्डाला सादर करण्यात आल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. मुंबई ते नाशिक, नागपूर या ७३६ किलोमीटर मार्गाचे सर्वेक्षण, शिवाय प्रकल्पाचे रेखाचित्र, पर्यावरणावरील सामाजिक परिणाम यांसह अन्य सर्वेक्षण करण्यात आले आहे. या अहवालाच्या मंजुरीनंतर भूसंपादनासह अन्य प्रक्रियांनाही गती दिली जाईल, असेही सांगितले.