मुंबई : मुंबई – नागपूर समृध्दी महामार्ग विस्तारीकरण प्रकल्पातील तीन महामार्गांच्या बांधकामासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) मागविलेल्या निविदेला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. तीन प्रकल्पांसाठी एकूण ४६ तांत्रिक निविदा सादर झाल्या आहेत. नागपूर-चंद्रपूरसाठी २२, भंडारा – गडचिरोलीसाठी चार, तर नागपूर – गोंदियासाठी २० अशा एकूण ४६ निविदा सादर झाल्या आहेत. येत्या दहा-बारा दिवसांत आर्थिक निविदा खुल्या करण्यात येणार असून त्यानंतर निविदा अंतिम करून चालू वर्षातच तिन्ही महामार्गांच्या कामाला सुरुवात करण्याचे एमएसआरडीसीचे नियोजन आहे.

समृध्दी महामार्गाचा नागपूर चंद्रपूर, भंडारा – गडचिरोली आणि नागपूर – गोंदिया असा विस्तार करण्यात येणार आहे. या तिन्ही महामार्गांच्या कामासाठी एमएसआरडीसीने ११ टप्प्यांत निविदा मागविल्या होत्या. शुक्रवारी तांत्रिक निविदा खुल्या करण्यात आल्या असून या निविदेला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. तीन महामार्गांच्या कामासाठी ११ टप्प्यात ४६ निविदा सादर झाल्या आहेत. १९४ किमीच्या नागपूर – चंद्रपूर महामार्गासाठी सहा टप्प्यात २२ निविदा सादर झाल्या आहेत. तर १४२ किमीच्या भंडारा – गडचिरोली महामार्गासाठी एका टप्प्यात चार, तर १६२ किमीच्या नागपूर – गोंदिया महामार्गासाठी चार टप्प्यात २० निविदा सादर झाल्याची माहिती एमएसआरडीसीतील वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. तर आता दहा – बारा दिवसांत आर्थिक निविदा खुल्या करण्यात येतील, असेही त्यांनी सांगितले. ही निविदा प्रक्रिया पूर्ण करून कार्यादेश जारी करण्यात येणार आहे. या कामास २०२४ मध्ये सुरुवात करण्याचा एमएसआरडीसीचा प्रयत्न आहे. हे तिन्ही महामार्ग वाहतूक सेवेत दाखल झाल्यास विदर्भातील वाहतूक व्यवस्था मजबूत होईल, असा दावा करण्यात आला आहे.

हेही वाचा…करकरे, साळसकर यांच्या हत्येबाबत नवे प्रश्न; प्रकाश आंबडेकरांचे उज्ज्वल निकम यांना आव्हान, म्हणाले…

सादर झालेल्या निविदा अशा :

नागपूर-चंद्रपूर महामार्ग :
टप्पा १
ॲफकॉन इन्फ्रा, जीआर इन्फ्रा, एनसीसी, माँटेकार्लो

टप्पा २

ॲफकॉन इन्फ्रा, गवार कन्स्ट्रक्शन, बीएससीपीएल इन्फ्रास्ट्रक्चर, माँटेकार्लो

टप्पा ३
बीएससीपीएल इन्फ्रास्ट्रक्चर, गवार कन्स्ट्रक्शन, एचजी इन्फ्रा, पीएनसी इन्फ्रा

टप्पा ४

गवार कन्स्ट्रक्शन, एचजी इन्फ्रा, पीएनसी इन्फ्रा

टप्पा ५
गवार कन्स्ट्रक्शन,पटेल इन्फ्रा, एचजी इन्फ्रा

टप्पा ६

बीएससीपीएल इन्फ्रास्ट्रक्चर, गवार कन्स्ट्रक्शन,पटेल इन्फ्रा, एचजी इन्फ्रा

हेही वाचा…विद्यावेतनाच्या प्रश्नावर डॉक्टर आंदोलनाच्या पवित्र्यात, पाठपुरावा करूनही प्रशासनाचे दुर्लक्ष

नागपूर -गोंदिया महामार्ग

टप्पा १
ॲफकॉन इन्फ्रा, जी.आर. इन्फ्रा, माँटेकार्लो, एनसीसी
टप्पा २
ॲफकॉन इन्फ्रा, ॲपको इन्फ्रा, जीआर इन्फ्रा, एनसीसी, पीएनसी इन्फ्रा

टप्पा ३

ॲफकॉन इन्फ्रा, ॲपको इन्फ्रा, एनसीसी, ओरियन्टल स्ट्रक्चरल इंजिनीयरिंग, पीएनसी इन्फ्रा

टप्पा ४
ॲफकॉन इन्फ्रा, माँटेकार्लो, ओरियन्टल स्ट्रक्चरल इंजिनीयरिंग, एनसीसी, पटेल इन्फ्रा, पीएनसी इन्फ्रा, माँटेकार्लो

हेही वाचा…मुंबई : अमली पदार्थांची तस्करी प्रकरणी परदेशी व्यक्तीला अटक, पोटातून बाहेर काढल्या १० कोटीच्या कोकेनच्या ११० कॅप्सूल

भंडारा-गडचिरोली महामार्ग

टप्पा १
गवार कन्स्ट्रक्शन, जीआर इन्फ्रा, जे. कुमार इन्फ्राप्रोजेक्ट, पटेल इन्फ्रा

Story img Loader